गणेशोत्सव 2021: कोल्हापूरातून एक लाख मूर्ती जाणार परराज्यात

गणेशोत्सव 2021: कोल्हापूरातून एक लाख मूर्ती जाणार परराज्यात
Updated on
Summary

यंदा जवळपास सव्वा लाख गणेशमूर्ती परराज्यात, परजिल्ह्यात कोल्हापुरातून जाणार आहेत. त्याची तयारी जोरात सुरू आहे.

कदमवाडी (कोल्हापूर): यंदा सलग दुसऱ्या वर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. लॉकडाउनमुळे खुला उत्सव होणे मुश्कील बनले आहे. अशात मोठ्या गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी शासनस्तरावर मंत्रालयातून मान्यताच मिळालेली नाही. परिणामी यंदा मोठ्या गणेशमूर्ती बनविण्यापासून ते विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेला ब्रेक बसला आहे. परराज्य तसेच जिल्ह्यात मोठ्या मूर्ती कोल्हापुरातून मागविल्या जातात. त्याला यंदा खीळ बसली आहे. या उलट घरगुती पूजेच्या लहान मूर्तीची मागणी वाढली असून, यंदा जवळपास सव्वा लाख गणेशमूर्ती परराज्यात, परजिल्ह्यात कोल्हापुरातून जाणार आहेत. त्याची तयारी जोरात सुरू आहे.

गणेशोत्सव 2021: कोल्हापूरातून एक लाख मूर्ती जाणार परराज्यात
कोल्हापूर: खोराटवाडी गावात घुसला टस्कर हत्ती

शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही गणेशोत्सव थाटामाटात होतो. त्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळे हौसेनुसार मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. अशा मूर्ती बनविण्याचे काम बापट कॅम्प परिसरातील मूर्तीकार करतात. दरवर्षी किमान पाच हजारांवर मूर्ती परजिल्ह्यात जातात, तर नियमित आकाराच्या जवळपास दहा हजारांवर मूर्ती परजिल्ह्यात पाठवल्या जातात. याशिवाय घरगुती उत्सवाच्या तीन फुटाच्या आतील उंचीच्या जवळपास पन्नास हजारावर मूर्ती गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथे पाठवल्या जातात.

गणेशोत्सव 2021: कोल्हापूरातून एक लाख मूर्ती जाणार परराज्यात
कोल्हापूर जिल्ह्यात निर्बंध 'जैसे थे'; वीकेंड लॉकडाउन कायम

कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मर्यादाच्या चौकटीत साजरा झाला. यंदाही तीच अवस्था आहे. अशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने यंदाच्या उत्सवावरही लॉकडाउन किंवा खबरदारीच्या उपाययोजनांची टांगती तलवार आहे. त्यामुळे अनेक मंडळांनी गणेशउत्सव घरगुती स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतला. अशा मंडळांनी बापट कॅम्पमध्ये मोठ्या गणेशमूर्तीची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे मूर्तीकारांनी मोठ्या मूर्ती कमी प्रमाणात बनवल्या आहेत. अशातही ऐनवेळी मोठ्या मूर्तींची कोणी मागणी केली तर गैरसोय होऊ नये, यासाठी काही मूर्तीकारांनी ४ फुटापर्यंतच्या मूर्ती बनवल्या आहेत. मात्र त्याची विक्री होईल की नाही याची चिंता मूर्तीकारांना आहे.

गणेशोत्सव 2021: कोल्हापूरातून एक लाख मूर्ती जाणार परराज्यात
कोल्हापूर - विभागीय क्रीडा संकुलाचा प्रश्न लागणार मार्गी

वास्तविक, दरवर्षी पाच फुटापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती सार्वजनिक उत्सवात प्रतिष्ठापित केल्या जातात. कोरोनामुळे मोठ्या उत्सवांना शासनाने मर्यादा घातल्या आहेत. अशाच मर्यादा परराज्यातही आहेत. कोरोनाचे संकट कमी झाले तर मोठ्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यास मान्यता मिळेल अशी शक्यता होती. मूर्तीकार तसेच काही मंडळाच्यावतीने शासनकडे पाठपुरावाही सुरू होता. मात्र राज्य शासनाकडून मूर्तीची उंची अथवा उत्सव मोठा करण्याबाबत कोणतेही आदेश आलेले नाहीत. यासाऱ्याचा परिणाम म्हणून उत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याने मोठ्या मूर्तीची मागणी घटली. यातून जवळपास १ कोटीच्या उलाढालीला खीळ बसल्याचे सांगण्यात येत आहे.

गणेशोत्सव 2021: कोल्हापूरातून एक लाख मूर्ती जाणार परराज्यात
कोल्हापूर महापुराचा प्रश्‍न राज्यसभेत; संभाजीराजेंची विचारणा

यंदाच्या गणेश उत्सवालाही कोरोना खबरदारीचे कुंपन आहे. याचा अंदाज घेत सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तींची नोंदणीच फारशी केलेली नाही, त्यामुळे बापट कॅम्पसह बहुतांशी ठिकाणी मोठ्या मूर्तींचे काम अपवाद वगळता थंडावले आहे. महापूरानेही मूर्तीकारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बापट कॅम्प परिसरात मूर्ती काम धिम्या गतीने सुरू आहे. त्याचा येथील अर्थकरणावरही परिणाम होत आहे. असे असेल तरी घरगुती गणेशमूर्तींचे काम वेगात आहे. परजिल्ह्यात तसेच परराज्यात मूर्ती पाठवल्या जात आहेत.'

-सुरेश कातवरे, मूर्तीकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.