'गोकुळ'ला आलेल्या 'त्या' निनावी पत्राच्या आधारे गुन्हे दाखल करा; औषध घोटाळ्याबाबत शौमिका महाडिक स्पष्टच बोलल्या

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघाकडे काल औषध घोटाळ्याबाबत (Medicine Scam) निनावी पत्र आले आहे.
Shoumika Mahadik Drug Scam
Shoumika Mahadik Drug Scamesakal
Updated on
Summary

''गोकुळमध्ये चुकीचा कारभार होत आहे. याबद्दल अनेकवेळा आवाज उठवला होता. याची चौकशीही झाली. न्यायालयाने या कारभाराबाबत ताशेरी ओढले आहेत.''

कोल्हापूर : गोकुळच्या (Gokul Dudh Sangh) कारभारावर उच्च न्यायालयाने (High Court) ताशेरे ओढले आहेत. त्यानुसार गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त झाले असते. मात्र, ही कारवाई वैयक्तिक आकसापोटी करून गोकुळची बदनामी केली असे चर्चा झाली असती. त्यामुळे ही कारवाई मीच थांबवली आहे. तसेच गोकुळकडे आलेल्या निनावी पत्रातील औषध घोटाळ्याची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी येथे केली.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघाकडे काल औषध घोटाळ्याबाबत (Medicine Scam) निनावी पत्र आले आहे. याबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. महाडिक म्हणाल्या, ‘गोकुळ’मध्ये चुकीचा कारभार होत आहे. याबद्दल अनेकवेळा आवाज उठवला होता. याची चौकशीही झाली. न्यायालयाने या कारभाराबाबत ताशेरी ओढले आहेत.

Shoumika Mahadik Drug Scam
Ashadhi Wari : पंढरपुरात राजकीय वातावरण तापलं! राहुल गांधी-शरद पवारांना निंबाळकरांचा विरोध; मोहिते-पाटलांच्या निमंत्रणावरून मोठा वाद

मात्र, सत्ताधारी संचालकांना काही दिवस संधी द्यावी, या हेतूने ही कारवाई आपण स्वतःच थांबवली आहे. मात्र, अजूनही हा कारभार थांबलेला नाही. ‘गोकुळ’मध्ये डॉक्टरांकडून गैरव्यवहार केला जात असल्याचे निनावीपत्र आले आहे. या पत्राला बेदखल करण्याऐवजी त्याची चौकशी करून फौजदारी दाखल करावी, हे पत्र खोडसाळपणे लिहिले आहे असं म्हणणं चुकीचं आहे.

Shoumika Mahadik Drug Scam
Jyotiba Temple : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! जोतिबा देवाच्या मूर्तीचं दर्शन 'इतके' दिवस राहणार बंद, काय आहे कारण?

...म्हणून निनावी पत्राद्वारे दिली माहिती

प्रस्थापितांना अंगावर घेणे परवडणार नाही म्हणूनच संबंधिताने औषध खरेदी घोटाळ्याची माहिती निनावी पत्राद्वारे दिली आहे. याची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.