गोकुळची गेल्यावर्षी ५१ कोटी लिटर दूध विक्री होती. यावर्षी ५० कोटी लिटर झाली आहे. दूध विक्रीत १ कोटी लिटरने घट झाली आहे.
कोल्हापूर : गोकुळच्या सत्ताधाऱ्यांनी गोकुळचे पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करून कोणाच्या तरी घशात घालण्याचा घाट घालू नये. पन्नास लिटर दूध पुरवठा करण्याची अट शिथिल करून स्वत:च्या संस्था घुसडून गोकुळची खासगीकरण करण्याकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे पन्नास लिटर दूध संकलनाची अट रद्द करू नये, अशी मागणी करत गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबई येथील दूध विक्री १ कोटी ४७ लाख लिटरसह पशुखाद्य, दुग्धजन्य पदार्थ विक्रीतही मोठी घट झाल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी केला.