सभेला गुंड आणि बनावट सभासद आणल्याचा आरोप करत पाटील गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Gokul Dudh Sangh Sabha) काल (शुक्रवार) गोंधळातच झाली. सुमारे एक तास झालेल्या सभेतील गोंधळ शेवटपर्यंत संपला नाही. कागल पंचतारांकित एमआयडीसीमधील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात सभा झाली.
दरम्यान, विरोधकांनी समांतर सभा घेतली. सत्ताधाऱ्यांनी सभेसाठी बनावट सभासद आणले, प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, असा आरोप विरोधकांतर्फे करण्यात आला. सर्व प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचे सांगूनही विरोधी महाडिक गटाने सभा उधळवून लावण्यासाठी गुंडांना प्रवेश दिला आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला.
‘एकच साहेब बंटी साहेब (Satej Patil) आणि महाडिक-महाडिक धुमधडाका’ आवाजी घोषणांमध्येच विषय पत्रिकेवरील १ ते १२ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. आयत्या वेळच्या विषयासह लेखी आलेल्या २४ प्रश्नांना अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी उत्तरे दिली. मात्र, दोन्ही गटांतील गोंधळ शेवटपर्यंत संपला नाही. याच गोंधळात सभा संपवण्यात आली.
दूध संकलन कमी झाले, वासाचे दूध परत का देत नाही, दूध संकलन घटले असताना, संकलन खर्चात वाढ कशी झाली, यासह इतर प्रश्न घेऊन संचालिका शौमिका महाडिक यांनी जिल्ह्याभर दौरा केला होता. त्या ‘गोकुळ’ची बदनामी करत आहेत, उत्पादकांची दिशाभूल करत आहेत, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे आजची सभा गाजणार असल्याचा अंदाज होता. त्यामुळे सभास्थळी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात होता.
दरम्यान, दुपारी एकला होणाऱ्या सभेसाठी हजारो सभासदांनी सकाळी अकरापासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली. पास पाहूनच सभासदांना सोडण्यात आले. यावेळी काहींना बनावट पास दिल्याचे सांगत महाडिक गट आक्रमक झाला. सभेला गुंड आणि बनावट सभासद आणल्याचा आरोप करत पाटील गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. सभेची वेळ होत आल्यामुळे अनेकांनी बॅरिकेटस् वरून उड्या मारत सभागृहात प्रवेश केला.
‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे, मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), आमदार सतेज पाटील यांच्यासह संचालक दुपारी १२.५५ वाजता व्यासपीठावर आले. यावेळी, दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विजयाच्या घोषणा सुरू झाल्या. ठीक एकला सभा सुरू झाली. अध्यक्ष डोंगळे यांनी ताळेबंद वाचण्यास सुरुवात करताच सभागृहात खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक व शौमिका महाडिक यांचे झेंड आणि पोस्टर झळकवत प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीही पाटील यांचे फलक झळकवत महाडिक गटासमोर अखंडपणे जोरदार घोषणा सुरू ठेवल्या.
संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी विषय प्रत्रिकेचे वाचन केले. याला बहुमताने मंजुरी देण्यात आली. ताळेबंदानंतर डोंगळे यांनी लेखी आलेल्या सर्व प्रश्नांचे वाचन करत उत्तरे दिली. यात शौमिका महाडिक यांनी विचारलेल्या प्रश्नांसह विविध संस्थांच्या प्रश्नांचा समावेश असल्याचे डोंगळे यांनी सांगितले. संचालिका महाडिक यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
मात्र, तुम्ही संचालक आहात; संचालक मंडळाच्या बैठकीत कोणताही प्रश्न विचारा, त्याला उत्तर दिले जाईल, असे डोंगळे यांनी स्पष्ट करत सभासदांनी प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. त्यानंतर संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आभार मानले आणि सभा संपवण्यात आली. त्यानंतरही आमच्यासोबत आलेल्या सभासदांना प्रश्न विचारायचे होते; पण ऐकून न घेता सभा संपवल्याचे महाडिक यांनी सांगत समांतर सभेची घोषणा केली. सभेला मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
महाडिक-पाटील गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झालेल्या गोंधळाचा महिला सभासदांना त्रास होत होता. त्यामुळे गोंधळ सुरू होता, त्या ठिकाणच्या महिलांनी आठ ते दहा फूट लांब ठेवलेल्या खुर्च्यांवरच बसणे पसंत केले.
सभेत शौमिका महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार धनंजय महाडिक व शौमिका महाडिक यांचे पोस्टर, झेंड फडकवले. किंगमेकर म्हणून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे तर, श्री. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांचे पोस्टर झळकविले. या गोंधळामुळे इतर सभासदांना सभा ऐकण्यात अडथळे आले.
वासाचे दूध परत करणे गुन्हा आहे. त्यामुळे अशा दूध दरात आणखी वाढ
पशुसंवर्धन अधिकारी भरतीसाठी नियम-अटी ठरविणार
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतीबाबत निर्णय घेणार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.