गोंधळात 'गोकुळ'ची सभा सुरु, 'ती समांतर सभा घ्यावी लागणार' : शौमिका महाडिक

आमच्यासोबत असलेल्या ठराव धारकांना बसण्यासाठी खुर्च्या मिळाल्या नाहीत तर...
kolhapur gokul meeting
kolhapur gokul meeting
Updated on
Summary

आमच्यासोबत असलेल्या ठराव धारकांना बसण्यासाठी खुर्च्या मिळाल्या नाहीत तर...

कोल्हापूर : धडाका धडाका, महादेवराव महाडिकांचा धुमधडाका.. वाचवा रे वाचवा, गोकुळ वाचवा अशी घोषणाबाजी करत विरोधी गटाच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी शासकीय विश्राम गृहापासून सभा ठिकाण असलेल्या सैनिक दरबार हॉलपर्यंत शक्ती प्रदर्शन केले आहे. यावेळी उपस्थित काही नेते आणि माजी आमदार महादेराव महाडिक छायाचित्र असलेले झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी सभागृहात प्रवेश केला आहे.

kolhapur gokul meeting
Ganeshotsav 2022 : बाप्पाच्या डेकोरेशनसाठी करा फुलांची सजावट; पाहा सोप्या आयडिया

आम्ही सभागृहात जाण्यापूर्वी सभागृह हाऊसफुल झाले आहे. आमच्यासोबत असलेल्या ठराव धारकांना बसण्यासाठी खुर्च्या मिळाल्या नाहीत तर मी व्यासपीठावर न जाता त्यांच्यासोबत सभागृहात राहून प्रश्न विचारणार आहे. अजून ठरावधारक बाहेर आहेत तर आत बसलेले ते कोण आहेत, अशीही विचारणा शौमिका महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक हे शासकिय विश्रामपासून शक्ती प्रदर्शन करत सभागृहात आले. यानंतर शौमिका महाडिक या सभागृहात न जाता बॅरिकेट्सजवळ थांबल्या. यावेळी तेथे बोलताना त्यांनी अशी समांतर सभा घ्यावी लागणार असून मी ती सभागृहाबाहेर घेणार अशी माहिती दिली आहे. दरम्यान, आता गोकुळच्या सभेला सुरुवात झाली असून घोषणाबाजी सुरु आहे. सध्या अध्यक्षांचे भाषण सुरु आहे. यावेळी नंतर येणाऱ्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न करू नये, जागा आहे तिथे बसून घ्यावे असा टोमणा त्यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.

kolhapur gokul meeting
Crime : इचलकरंजीत कामगाराच्या मुलाचा निर्घृण खून; धारधार शस्त्राने केले वार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()