gokul
gokulsakal

Gokul Milk News: तीन रुपये कमी द्या, पण गाईचे दूध स्वीकारा ; शेतकऱ्यांची मागणी !

Published on

Gokul Milk News राज्यातील इतर संघांकडून गाय दुधाला सरासरी २८ रुपये दर दिला जात आहे. त्यामुळे, गाय दुधाला प्रतिलिटर ३३ रुपयांऐवजी ३० रुपये दर द्या. पण ‘गोकुळ’कडून सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील गाईचे सर्व दूध खरेदी करा, अशी मागणी सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील दूध संस्था व उत्पादकांनी आज केली. त्यामुळे ‘गोकुळ’कडून सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील दूध ३० रुपयेप्रमाणे खरेदी केले जाणार आहे.

‘गोकुळ’ च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात ‘गोकुळ’चे पदाधिकारी आणि दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बनाळी (ता. जत, सांगली) येथील जोतिर्लिंग सहकारी संस्थेचे संजय पाटील म्हणाले, ‘इतर संघांकडून अपेक्षित दर मिळत नाही. याशिवाय, दररोजचे दोन ते तीन वेळचे दूध स्वीकारतीलच याची खात्री नाही. त्यामुळे, गोकुळने सांगली, सोलापूरसह इतर जिल्ह्यांतील गाईचे दूध प्रतिलिटर तीन रुपये कमी करुन स्वीकारावे.

gokul
Sakal Podcast : कंत्राटी भरतीचा जीआर रद्द पण खापर ठाकरे सरकारवर

मंगळवेढा गुंजेगाव येथील विजया दूध संस्थेचे बाबासाहेब रेड्डी म्हणाले, ‘देशात नावाजलेल्या एका मोठ्या दूध संघासह राज्यातील इतर संघांकडून पाईप गळतीसह इतर कारणे सांगून दोन ते तीन वेळेचे दूध अचानकपणे स्वीकारत नाहीत. अशावेळेला हजारो लिटर दूध द्यायचे कोणाला, असा प्रश्‍न पडत आहे. हे नुकसान शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे गोकुळने सोलापूर आणि सांगलीमधील गाय दूध प्रतिलिटर ३३ ऐवजी ३० रुपयांप्रमाणे खरेदी करावे.


माणगंगा (कडलास, जि. सोलापूर) संस्थेचे शिवाजीराव गायकवाड, संभाजी चौगले (अकोला), अभिजित चव्हाण (कवठेमहांकाळ) यांनी ‘गोकुळ’चा कारभार पारदर्शी असून येथील फॅट, एसएनएफ, वजन काटा व्यवस्थित आहे. वेळेत बिले दिली जातात, असे सांगितले. यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, बाळासाहेब खाडे, किसन चौगले, बयाजी शेळके उपस्थित होते.

gokul
Mumbai Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

सध्या १ लाख ६८ हजार लिटर दूध पुरवठा
कडलास, अकोला व गुंजेगाव (जि. सोलापूर) व बनाळी आणि कदमवाडी (जि. सांगली) येथून फेब्रुवारी २०२३ मध्ये गोकुळला गाईच्या दुधाचा प्रतिदिन ११ हजार ८०९ लिटर पुरवठा होत होता. सध्या १ लाख ६८ हजार १४ लिटर दूध पुरवठा केला जात आहे. त्यामुळे, मागणीनुसार गोकुळकडून हे सर्व दूध प्रतिलिटर ३ रुपये कमी दराने खरेदी केले जाणार आहे.

gokul
Gokul: ‘गोकुळ’तर्फे दूध उत्पादकांना १०१ कोटींचा फरक, दिवाळीपूर्वी 'या' तारखेला रक्कम जमा होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.