Gokul Dudh Sangh : दुधाचा 'गोकुळ-शक्ती' नवा ब्रँड मुंबई गाजवणार; मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास

उत्कृष्ट चव आणि उत्तम प्रतीमुळे गोकुळ दूध संघाने मुंबई, पुणे, कोकण व अन्य ठिकाणी मोठा ग्राहकवर्ग जोडला आहे.
Gokul-Shakti New Brand Guardian Minister Hasan Mushrif
Gokul-Shakti New Brand Guardian Minister Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

'संघामार्फत फुल क्रीम व गाय दुधाची विक्री सांगली, बेळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच पणजी (गोवा), पुणे व मुंबई, ठाणे जिल्ह्यात होत आहे.'

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) गोकुळ - शक्ती हा नवा ब्रँड (Gokul - Shakti Brand) मुंबई गाजवणार, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केला.

गोकुळ शक्ती नावाने तयार केलेल्या नवीन टोण्ड दुधाचा विक्री व वितरण प्रारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालकांच्या उपस्थितीत नवी मुंबई (वाशी) येथे झाला.

Gokul-Shakti New Brand Guardian Minister Hasan Mushrif
'संजीवराजेंना खासदारकीचं तिकीट मिळालं नाही, तर तुम्हालाही तिकीट मिळून देणार नाही'; रामराजेंचं कोणाला चॅलेंज?

मुश्रीफ म्हणाले, ‘उत्कृष्ट चव आणि उत्तम प्रतीमुळे गोकुळ दूध संघाने मुंबई, पुणे, कोकण व अन्य ठिकाणी मोठा ग्राहकवर्ग जोडला आहे. ग्राहक तसेच मुंबईतील वितरकांनी ठराविक प्रतीचे स्पेशल दूध गोकुळकडून उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. यावर निर्णय होऊन गोकुळने ४.१ फॅट व ९.२ एस. एन.एफ प्रतीचे गोकुळ शक्ती नावाचे स्पेशल होमोजिनाइज्ड व बॅक्टोफ्युज दूध मार्केटमध्ये आणले आहे.’

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘गोकुळ दूध उत्कृष्ठ चवीमुळे मुंबई तसेच उपनगरांत घराघरात पोहोचले आहे. गोकुळ शक्ती दूध बाजारपेठेत नाव करेल. वितरकही सहकार्य करतील.’ संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, ‘संघामार्फत फुल क्रीम व गाय दुधाची विक्री सांगली, बेळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच पणजी(गोवा), पुणे व मुंबई, ठाणे जिल्ह्यात होत आहे. दररोज १४ लाख लिटर विक्री होते. गोकुळच्या पनीर, श्रीखंड, तूप, टेबल बटर, फ्लेवर मिल्क इत्यादी दुग्धजन्य पदार्थांना मागणी असते.

Gokul-Shakti New Brand Guardian Minister Hasan Mushrif
कर्नाटकातील स्वस्त डिझेलची महाराष्ट्रात विक्री; दररोज 30 हजार लिटरचा पुरवठा, सीमाभागातील अनेक पंपांना फटका

'गोकुळ शक्ती’ टोण्ड दुधाची गुणवत्ता फॅट ४.१ व एस.एन.एफ. ९.२ असून किंमत प्रतिलिटर रुपये ५५ ठेवली आहे.दूध १ लिटर व ५ लिटरचे पाऊचमध्ये उपलब्ध आहे. स्वागत, प्रास्ताविक संचालक विश्वास पाटील तर शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आभार मानले. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.

Gokul-Shakti New Brand Guardian Minister Hasan Mushrif
सरकारचा विरोध असतानाही सीमाभागातील 865 गावांना मिळणार महाराष्ट्राच्या 'या' योजनेचा लाभ; कसं ते जाणून घ्या..

यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अम‍रसिंह पाटील, बयाजी शेळके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, वाशी शाखेचे व्‍यवस्‍थापक दयानंद पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.