मथुरेच्या बासरीची निपाणीत धून! दहीहंडीवर प्रशासनाची बंदी

'विकेंडमुळे खरेदीसाठी अल्प प्रतिसाद : दहीहंडीवर प्रशासनाची बंदी
nipani
nipanisakal
Updated on

निपाणी : दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने विविध सण, समारंभ, यात्रा-जत्रांवर बंदी घातली आहे. त्यामुळे सोमवारी साजऱ्या होणाऱ्या गोकुळाष्टमी सणावर त्याचे सावट गडद आहे. अशातच शनिवार-रविवार वीकेंड लाॅकडाउन असल्याने गोकुळाष्टमी सणावर मर्यादा आल्या आहेत. सणाच्या पार्श्वभूमीवर मथुरेच्या धुनसह विविध साहित्य बाजारपेठेत दाखल झाले असले तरी विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने खरेदीला अत्यल्प प्रतिसाद लाभला. सार्वजनिक ठिकाणच्या दहीहंडीवर प्रशासनाने बंदी घातली आहे. याशिवाय शाळा बंद असल्याने यंदा साहित्य खरेदीची उलाढाल ठप्प झाल्याने विक्रेत्यातून नाराजी व्यक्त होत आहे.

केवळ एक दिवसांवर श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव आला आहे. जन्माष्टमीनिमित्त बाजारात पाळणे, बासरीसह श्रीकृष्णाच्या पोशाखांची आठवड्यापूर्वी आवक वाढली होती. शनिवार, रविवारी विकेंड लॉकडाउन असल्याने अनेक भाविकांनी शुक्रवारपर्यंत बाजारात आलेले श्रीकृष्णाचे अनेक साज हे दिल्ली, मथुरा येथून आलेले धून खरेदी केली आहे. त्यामुळे या जन्माष्टमीला निपाणी परिसरातील घराघरात मथुरेच्या बासरीची धून ऐकावयास मिळणार आहे.

nipani
नवा ट्विस्ट: जयंत पाटलांच्या उजवीकडे सुमनताई तर डावीकडे संजयकाका

श्रावण सोमवारी (ता.३०) श्रीकृष्ण जयंती आहे. कोरोनामुळे मंदिर बंद असले तरी यंदा घरोघरी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. येथील बाजारात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध साहित्य दाखल झाले आहे. शाळा, महाविद्यालय, ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो. या कार्यक्रमात मुलांना श्रीकृष्ण, राधा बनवून शाळेत एक प्रकारे गोकूळ निर्माण होते. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसाठी खरेदी होणारा श्रीकृष्णाचा साज, इतर साहित्याची यंदा म्हणावी तशी मागणी नाही. राधा कृष्णाचा पोशाखा विद्यार्थ्यांसाठी भाड्याने दिला जातो. परंतू शाळा बंद असल्याने त्यावरही परिणाम झाला आहे.

श्रीकृष्ण जन्मोत्सवाची परंपरा अनेक ठिकाणी जपली जाते. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक दहीहंडीवर बंदी असली तरी घरात जन्मोत्सव साजरा होईल. जन्मोत्सवानिमित्त लागणाऱ्या साहित्य खरेदी पूर्ण झाली आहे.

-दीपाली जाधव, भाविक

'कोरोनामुळे दीड वर्षापासून सणासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करूनही त्याची खरेदी झालेली नाही. केवळ घरगुती स्वरूपासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी झाली आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे साहित्य पडूनच आहे.'

-अभिषेक गुप्ता, साहित्य विक्रेते, निपाणी

जन्माष्टमीनिमित्त लागणारे साहित्य व दर

  • पाळणा : १५०-१२००

  • बासरी : ३०-१००

  • कंबरपट्टे : १००-५००

  • पोशाख : ३००*१०००

  • टोप मोतीवाला: ५०-४००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.