कोल्हापूर - कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. अशात ‘सीपीआर’मध्ये सुरवातीपासून वेळीच स्वॅब संकलन व तपासणी सत्रामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यासाठी सीपीआर नाक, कान, घसा विभागाने साडेपाच महिन्यांत तब्बल २० हजार स्वॅबचे संकलन करीत सर्वाधिक कोरोनामुक्त करण्यास हातभार लावला आहे.
कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने अनेकजण भयभित झाले. सर्दी, खोकला, थंडी, तापाचीलक्षणे दिसताच सीपीआर रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्यांचा ओघ अद्याप कायम आहे. अशात ज्यांना कोरोनाच्या व्याख्येत बसणारी लक्षणे आहेत, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. त्यासाठी सीपीआरच्या नाक, कान, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांचे एक पथक कार्यरत आहे.
कोरोना निदान करण्यासाठी नेसोफॅरिजियल किंवा घशातील स्राव तपासणीसाठी घेतला जातो. मानवी शरीरात कोरोना विषाणूचा प्रवेश मुख्यत्वे नाकाद्वारे किंवा घशाद्वारे होतो. त्यामुळे नाकातील स्त्राव तपासणीसाठी घेतला जातो.
साडेपाच महिन्यापासून स्वॅब घेण्याची जबाबदारी नाक, कान, घसा विभागावर आहे. यात डॉ. मिलिंद सामानगडकर, डॉ. तुषार ताजने, डॉ. वासंती पाटील यांच्यासह दहा निवासी डॉक्टर यांचे पथक सीपीआरमध्ये दिवसरात्र तिन शिप्टमध्ये स्वॅब संकलन कार्यात सक्रिय आहेत.
येथे एका शिप्टमध्ये कमीत कमी ७० ते ३०० व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले. त्यामुळे झटपट स्वॅब संकलन करणे, बारकोड करणे, नोंद घेणे, रूग्णांची केस हिस्ट्री नोंदवण्यापासून ते स्वॅब सुरक्षित पॅकिंग करून प्रयोगशाळेकडे पाठवणे हा क्रम सुरळीत झाला. त्यामुळे स्वॅबची तपासणी होऊन वेळीच निदान व उपचार सुरू झाल्याने बहुतेकजण कोरोनामुक्त झाले.
हे पण वाचा - 101 चं याडचं भारी ; मानसिंगरावांची नित्य सवारी...!
पुन्हा तेथेच रुजू होत दाखविली जिगर
कोल्हापुरात ७९ कोविड सेंटर आहेत. यातील सर्वाधिक स्वॅब ‘सीपीआर’मध्ये घेण्यात आले. या पथकातील तीन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आले, तरीही त्यांनी उपचार घेऊन कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा त्याच कामात सहभाग घेत मोठी जिगर दाखविली आहे. याबद्दल राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी या विभागाचे कौतुक केले आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.