Gopichand Padalkar
Gopichand Padalkaresakal

Gopichand Padalkar : धनगड म्हणजेच धनगर हे फडणविसांना मान्य, हक्काचे आरक्षण मिळणार; पडळकरांचा दावा

एकजूट करा आणि आरक्षण लढ्यात सहभागी व्हा.
Published on
Summary

महाराष्ट्रात लांडग्यांची पिलावळ आहे. ती घरे फोडण्यात माहीर असल्याने आपल्या हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी, आडवे येणाऱ्यांना गाडून टाकायला पाहिजे.

पट्टणकोडोली : संविधानात नसलेले एनटीचे आरक्षण धनगर समाजाला देऊन शरद पवार यांनी फसवणूक केली, असे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल बिरदेव मंदिराच्या सभागृहात धनगर समाज जागर यात्रेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून समाजसुधारकांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सभेस सुरवात झाली. राज्यात धनगड समाज नाही. त्यामुळे कोणाला दाखलाही मिळाला नाही. धनगड म्हणजेच धनगर आहेत हे सरकारला मान्यच करावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य केले आहे.

Gopichand Padalkar
Dhangar Reservation : ..म्हणूनच शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला; पडळकरांनी सांगितलं कारण

न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूनेच लागेल. महाराष्ट्रात लांडग्यांची पिलावळ आहे. ती घरे फोडण्यात माहीर असल्याने आपल्या हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी, आडवे येणाऱ्यांना गाडून टाकायला पाहिजे. एकजूट करा आणि आरक्षण लढ्यात सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले.

Gopichand Padalkar
Chiplun : बहादूरशेख नाक्यावर उड्डाणपुलाचे 30 गर्डर कोसळले; मंत्री चव्हाणांनी दिले चौकशीचे आदेश, दोषींवर होणार कारवाई

या सभेस पिवळ्या टोप्या परिधान करून धनगरबांधव उपस्थित होते. यळकोट यळकोट जय मल्हार...च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते.यावेळी शिवराज बिडकर आबासो कोकरे, संगीता खोत, अशोक माने, डॉ. मनीषा डांगे, रामचंद्र डांगे, ललिता पजारी, शिवाजी ओमा पुजारी, शरद पुजारी, रानोजी भाणसे, देवस्थान पंच कमिटी व समस्त पुजारी धनगर समाज यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.