Dhairyasheel Mane
Dhairyasheel Maneesakal

Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू; खासदार मानेंची माहिती

पन्हाळा तहसील कार्यालयासमोर जाफळेतील दोघांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
Published on
Summary

सरकारने दिलेली मुदत संपेपर्यंत उपोषण स्थगित करावे; असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.

पन्हाळा : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्हे सामील करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन. वयाचा विचार करून उपोषण सोडावे, अशी विनंती खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी केली.

Dhairyasheel Mane
Maratha Reservation : 'जो कोणी मराठा आरक्षणाला विरोध करेल, त्‍याला आता सुटी नाही'; जरांगे-पाटलांचा स्पष्ट इशारा

पण, उपोषणकर्ते उपोषणावर ठाम राहिले. पन्हाळा तहसील कार्यालयासमोर जाफळेतील दोघांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सातव्या दिवशी उपोषणस्थळी खासदार धैर्यशील माने यांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिपुगडे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, माजी पं. समिती सभापती अनिल कंदूरकर व मान्यवरांसमवेत भेट दिली.

Dhairyasheel Mane
Loksabha Election : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उतरणार लोकसभेच्या आखाड्यात; कोणत्या पक्षानं दिली उमेदवारी?

आरक्षण देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आरक्षण समिती जिल्ह्यात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करीन. सरकारने दिलेली मुदत संपेपर्यंत उपोषण स्थगित करावे; असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले. यावर प्रतिक्रिया देताना उपोषणकर्त्यांनी मराठा आरक्षण मिळाल्याखेरीज उपोषण सोडणार नसल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.