शासनाची जागा हाय, कोण विचारतयं ?

Government seat Hi, who is asking?
Government seat Hi, who is asking?
Updated on

नानीबाई चिखली :  मेतगे (ता. कागल) येथील गायरानात एकूण 28 एकरापैकी 27 एकरांवरती ग्रामस्थांनी अतिक्रमणे केली होती. या अतिक्रमणधारकांना प्रशासनाने वेळोवेळी नोटीसा पाठवून अतिक्रमण काढण्यास सांगितले होते. प्रशासनाच्या या आवाहनाला कांही ग्रामस्थांनी प्रतिसाद देखील दिला होता. तर कांहीनी अतिक्रमणे तशीच ठेवलेली होती. आज पोलिस बंदोबस्तात उर्वरित सर्व अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यामुळे हे गायरान अतिक्रमण मुक्त झाले आहे. यावेळी गावकऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली होती. 

गावापासून दक्षिणेकडील बाजूला ही 28 एकर गायरान जमीन आहे. सलग, सपाट,एका रेषेत असणाऱ्या या गायरानात कांही ग्रामस्थांनी जनावरांचा गोठा, वैरण ठेवण्यासाठी पत्र्याचे शेड करून जागा आरक्षित केल्या होत्या. तर काहीनी कुंपनच करून सभोवती चरी मारून आपली जागा आरक्षित केली होती. 

शासनाच्या मालकी हक्कात असल्याने कोण विचारतोय असे म्हणत ग्रामस्थांनी अतिक्रमणाचा सपाटाच लावला होता. जणू अतिक्रमण करण्यासाठी येथे स्पर्धाच लागली होती. अशावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, मुरगुडच्या पोलिस उपनिरीक्षक विद्या जाधव यांनी भेट दिल्याने ही गंभीर बाब यावेळी उघडकीस आली होती. त्यावेळी त्यांनी अतिक्रमणे काढण्यास सांगतानाच संबंधितांना नोटीसा देखील पाठविल्या होत्या. त्यास काहींनी प्रतिसाद दिला. तर कांहीनी आपली अतिक्रमणे हटवली नव्हती. यामुळे आज सकाळीच उर्वरीत अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आली. अतिक्रमणे हटविण्याचे हे काम दिवसभर सुरू होते. 

शासनाची मालकी हक्क असलेल्या गायरानात काहीजण अतिक्रमण करून या जागेचा वापर करतात. मेतगे येथे तर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यामुळे अतिक्रमण हटाव ही मोहिम येथे राबविली. आता याचप्रमाणे तालुक्‍यातील अन्य गावातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबवू. 
- शिल्पा ठोकडे, तहसिलदार, कागल 

 

अतिक्रमण धारकांना मे महिन्यात नोटीसा दिलेल्या होत्या. कांहीनी त्यास प्रतिसाद दिला तर कांहीनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केलेला होता.यापुढे शासकीय जागेवरती कोणीही अतिक्रमणे करण्याचा प्रयत्न करू नये. 
- शबाना मोकाशी, गटविकास अधिकारी 


दृष्टिक्षेप ः 
- 28 एकरपैकी 27 एकर गायरान जागेवर अतिक्रमण 
- प्रशासनाने नोटिसा पाठवूनही ग्रामस्थांचे दुर्लक्ष 
- पत्र्याचे शेड, कुंपण घालून जागा आरक्षित 
- अतिक्रमण हटवण्यात प्रशासनाचा गेला दिवस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.