Govind Pansare Case : संशयित आरोपी समीर गायकवाडला साक्षीदाराने ओळखले; कोर्टात काय झालं? जाणून घ्या..

पानसरे खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर दिवसभर झाली.
Comrade Govind Pansare
Comrade Govind Pansareesakal
Updated on
Summary

ॲड. राणे यांनी पंच जाधव यांना समीर गायकवाडला अटक केली; तेव्हा काय काय झाले; काय जप्त केले, यासह इतर प्रश्न विचारले.

कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणातील (Govind Pansare Murder Case) पहिला संशयित समीर विष्‍णू गायकवाड (रा. सांगली) याच्याकडून अटकेवेळी जप्त केलेले दोन मोबाईल हॅण्डसेट अटक पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखले. तसेच पंचाने गायकवाडलाही जागेवर जाऊन ओळखले. साक्षीदारांच्या यादीतील हा सहावा पंच आणि साक्षीदार आहे.

पानसरे खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर दिवसभर झाली. त्यात अटक पंच साक्षीदार नितीन मंगेश जाधव (वय ३५) यांचा सरतपास आणि उलट तपास झाला. पुढील सुनावणी तीन आणि चार जुलैला आहे. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्यासह सर्व संशयित आणि त्यांचे वकील न्यायालयात हजर होते.

सकाळी साडेअकराच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. ॲड. राणे यांनी पंच जाधव यांना समीर गायकवाडला अटक केली; तेव्हा काय काय झाले; काय जप्त केले, यासह इतर प्रश्न विचारले. उत्तरात पंच जाधव यांनी गायकवाडकडे अंग झडतीवेळी एक स्मार्ट मोबाईल हॅण्डसेट आणि एक साधा हॅण्डसेट मिळाल्याचे सांगितले.

मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास राजारामपुरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अमृत देशमुख यांनी बोलविल्यामुळे मी आणि माझा शेजारचा मित्र करण शंभू यादव पोलिस ठाण्यात गेलो होतो. तेथील पंचनाम्यावेळी गायकवाडच्या पॅन्टच्या खिशात एका मोबाईलमध्ये ३७ नंबर, तर एका मोबाईलमध्ये २० नंबर असल्याचे दिसून आले. यावेळी त्याच्या अंगात ग्रे टी-शर्ट आणि चॉकलेटी पॅन्ट होती. पॅन्टच्या खिशातून मोबाईल हॅण्डसेट जप्त केल्याचे जाधव यांनी सांगितले.

Comrade Govind Pansare
Indian Army : 11 महिन्याच्या बाळाचा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच जवान सूरज यादव यांचं निधन, गावावर शोककळा

त्याच्या अंगावरील खुणा तपासून पोलिसांनी अटकेचा पंचनामा केला. आरोपीला ओळखू शकाल का, असे विचारल्यावर जाधव यांनी ‘विटनेस बॉक्स’मधून बोट करून समीर गायकवाड हाच असल्याचे दाखविले. नंतर संशयित बसलेल्या ठिकाणी जाऊन इतर संशयितांमध्ये बसलेला गायकवाड हाच असल्याचे सांगितले.

संशयितांतर्फे ॲड. रवींद्र इचलकरंजीकर, ॲड. समीर पटवर्धन, ॲड. प्रवीण करोशी, ॲड. ए. एस. रुईकर आणि ॲड. डी. एम. लटके यांनी अटकेतील पंच आणि साक्षीदार जाधव यांची उलट तपासणी घेतली. पोलिसांनी समीरच्या मोबाइलच्या मोबाईलचे स्क्रिन लॉक उघडले की नाही, मोबाइल खोलून त्याचा आयएमईआय नंबरही पाहिला की नाही, असे प्रश्न विचारले. त्याच्या पाकिटातील पैसे तसेच घड्याळ, पाकिट, बेल्ट जप्तीची नोंद पंचनाम्यात नाही.

Comrade Govind Pansare
मिरज पुन्हा हादरलं! पूर्ववैमनस्यातून चुलत भावाचा खून, तर उसन्या पैशावरुन भाजीविक्रेत्याला भोसकलं

संशयिताची कोऱ्या कागदावर सही घेऊन त्यानंतर हे सर्व लिहिले आहे की नाही, अशा वेगवेगळ्या प्रश्‍नांची सरबत्ती केली. यावेळी आठवत नाही, माहिती नाही अशी उत्तरे साक्षीदाराने दिल्यावर मुद्दाम उत्तरे टाळत असल्याचाही आक्षेप ॲड. इचलकरंजीकर यांनी न्यायाधीशाकडे घेतला. त्याची नोंद घेण्याची विनंती केली. न्यायालयात नितीन जाधव यांचा सरतपास आणि उलटतपास आज सायंकाळी पूर्ण झाला. पुढील सुनावणी तीन आणि चार जुलैला होणार आहे.

Comrade Govind Pansare
Satara : 'राजकारण्यांनो.. मराठा समाजाला ओबीसींचे दाखले देऊ नका, अन्यथा तुम्हाला मतदान करणार नाही'

समीरऐवजी आणला पानसरेंचा हॅण्डसेट

समीरला अटक केल्यानंतर त्याच्याकडील जप्त मोबाइल हॅण्डसेट न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी असलेल्या बॉक्सवर वकिलांनी सह्या करून तो उघडला. त्यावेळी दुसराच बॉक्स असल्याचे दिसून आले. समीर गायकवाडचा मोबाइल हॅण्डसेट पाहिजे होता; मात्र पानसरे यांचाच मिळाला. सुमारे पाऊण तासांनी समीरचे दोन मोबाईल हॅण्डसेट न्यायालयात हजर केले. त्यानंतर पुढे सुनावणी सुरू झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()