शिये (कोल्हापूर) : येथील ग्रामपंचायतीसाठी सत्ताधारी शिवसेना प्रणित जय भवानी विकास आघाडी व विरोधी जय श्री हनुमान ग्रामविकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत होत आहे. सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील करत आहेत. विरोधी आघाडीचे नेतृत्व सर्जेराव काशीद, पांडुरंग पाटील, विलास जाधव, जयसिंग काशीद व शिवाजी बुवा करत आहेत.
प्रभाग एक मध्ये सत्ताधारी आघाडीकडून माजी सरपंच विश्वास पाटील, माजी उपसरपंच वंदना चव्हाण व लहू बुवा यांच्या विरोधात माजी उपसरपंच जयसिंग पाटील, रेखा जाधव व विलास गुरव यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. याशिवाय पालकमंत्री सतेज पाटील समर्थक विकास चौगले याच प्रभागातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा - प्रचारात उतरायचे की घरात बसायचे?
प्रभाग दोन मधून सत्ताधारी आघाडीकडून कृष्णात चौगले, राणी बुवा, सुप्रिया मोरे यांच्या विरोधात कृष्णात चौगले, सुनीता रानगे, पूनम सातपुते निवडणूक लढवत आहेत. प्रभाग तीनमध्ये दोन जागा आहेत. स्टोन क्रशर असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष मोहन पाटील, माजी उपसरपंच यशवंत पाटील यांच्या गटाची व शिवसेनेची ताकद या प्रभागात एकत्र आहे. तर विरोधी आघाडीला जयसिंग काशीद यांच्या गटाची ताकद आहे. येथे सत्ताधारी आघाडीकडून अमर पाटील व मंगल कांबळे तर विरोधी आघाडीकडून प्रभाकर काशीद व पल्लवी मालेकर रिंगणात आहेत.
प्रभाग चारमध्ये सत्ताधारी आघाडीच्या महेश शिंदे, लता शिंदे व संदीप बुवा यांच्या विरोधात योगेश पाटील, शीतल मगदूम व हंबीरराव कोळी यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. अपक्ष उमेदवार दत्ता शिंदे यांची उमेदवारी आहे. प्रभाग पाच विद्यमान सरपंच रणजित कदम यांचा बालेकिल्ला आहे. त्यांनी येथे कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. येथे त्यांच्या वहिनी शीतल कदम या रिंगणात आहेत. माजी उपसरपंच छाया बुवा पुन्हा मैदानात आहेत. तसेच आनंदा कांबळे यांच्या विरोधात वृषाली नाईक, बाबासाहेब कांबळे व कोमल बुवा निवडणूक लढवत आहेत.
प्रभाग सहामधून शिवाजी गाडवे हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे माजी सरपंच बाबासाहेब जाधव व नवजीवन समूहाचे संस्थापक दत्तात्रय गाडवे यांचे चिरंजिव सुदर्शन गाडवे यांना मैदानात उतरवले आहे. शंकुतला माने यांचाही या प्रभागात चांगला संपर्क आहे. जिल्हा काँग्रेसचे सचिव संजय पोवार - वाईकर व सागर निकम हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
दृष्टिक्षेपात ग्रामपंचायत
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.