कोल्हापूर आणि पूर ही संकल्पना बदलू ; सतेज पाटील यांची माहिती

पालिकेत झालेल्या बैठकीत आमदार आवाडे यांची आक्रमक भूमिका.
satej patil ,ichlkarnji food visit
satej patil ,ichlkarnji food visit
Updated on

इचलकरंजी (कोल्हापूर) : पूरग्रस्तांना शासनाच्यावतीने देण्यात येणा-य़ा मदतीमध्ये पारदर्शकता ठेवण्यात येईल, अशी हमी पालक मंत्री सतेज पाटील यांनी येथे दिली. पूरग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याबाबत येत्या तीन ते चार महिन्यात धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. मंत्री पाटील यांनी आज इचलकरंजीतील पूरबाधीत क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर पालिकेत झालेल्या बैठकीत त्यांनी शासनाची भूमिका मांडली. (Guardian-Minister-satej-patil-Survey-of-flood-affected-area-in-Ichalkaranji-dhairyashil-mane-prakash-awade-akb84)

मंत्री पाटील म्हणाले, महापूराच्या प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये तातडीने व दिर्घकालीन अशा उपाययोजनांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि पूर ही संकल्पना बदलण्याची शासनाची भुमिका आहे. पूरग्रस्तांना शासनाकडून जास्तीतजास्त निधी देण्याचा प्रयत्न सुरु आहे. स्वच्छतेच्या कामासाठी दोन दिवसांत सक्शन टँकरसह अन्य वाहने उपलब्ध करुन देण्यात येतील.

satej patil ,ichlkarnji food visit
कोल्हापूर विमानतळाचे नामकरण करा; संभाजीराजेंची मागणी

धैर्यशील माने म्हणाले, चुकीच्या पध्दतीने केलेल्या बांधकामांमुळे पाण्याचे प्रवाह थांबत आहेत. त्यामुळे महापूराच्या घटना होत आहेत. पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांचे बहुमजली इमारतीत पूनर्वसन करण्याबाबत कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. मदतीसाठी कांही निकष बदलावे लागणार आहेत. यंत्रमाग उद्योगाचे झालेले नुकसान मोठे आहे. त्याला एक आराखडा तयार केला. त्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे भरीव मदत देतील.

आमदार प्रकाश आवाडे यांनी विविध मागण्यांचे निवेदन मंत्री पाटील यांना दिले. यामध्ये पाणंद, रस्ते दुरुस्त करा, काळ्या अोढ्यावर विविध पूल बांधा, नगरोत्थान योजनेतील प्रलंबीत कामे मार्गी लावा, आवाडे वीज उपकेंद्राचा एक मजला वाढवा, प्रत्येक घरी जावून आर्थिक मदत करा, आयजीएम रुग्णालयात नाॅन कोविड विभाग सुरु करा, खराब विद्युत मिटर मोफत बदलून द्या आदी मागण्यांच्या समावेश आहे.यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, नगरसेवक रविंद्र माने, सतिश कोष्टी, संजय जाधव, अजय जावळे, अविनाश कांबळे, शेखर शहा, नगरसेविका संगीता आलासे आदींनी सूचना मांडल्या. उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार राजू आवळे, प्रांताधिकारी विकास खरात, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, मदन कारंडे, अपर तहसिलदार शरद पाटील, राहूल खंजीरे, शशांक बावचकर, उदयसिंह पाटील, सागर चाळके, दीपक सुर्वे, महादेव गौड, अमित गाताडे आदी उपस्थीत होते. कामगार अधिकारी विजय राजापूरे यांनी आभार मानले.

दरम्यान, मंत्री पाटील यांनी नदीवेस नाका परिसरात महापूरांने झालेल्या नुकसानींची पाहणी करुन पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी आवाडे मळा वीज उपकेंद्र व नाट्यगृहातील पूरग्रस्त छावणीस भेट दिली.

Summary

भांडल्यावर थोडे देतात. त्यामुळे सध्या भांडल्याशिवाय कांही मिळत नाही, अशा शब्दात शासनाकडून मिळणा-या मदतीबाबत आपल्या आमदार आवाडे यांनी भावना व्यक्त केल्या.

आमदार आवाडे आक्रमक

आमदार आवाडे यांनी पालिकेत झालेल्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. भांडल्यावर थोडे देतात. त्यामुळे सध्या भांडल्याशिवाय कांही मिळत नाही, अशा शब्दात शासनाकडून मिळणा-या मदतीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. पूरग्रस्तांना मदत देतांना चुका केला तर सोडणार नाही, असा दमही त्यांनी मंत्री पाटील यांच्या साक्षीने प्रशासनाला दिला. प्रत्येक घरात जावून आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.