suraj nalawade
suraj nalawadesakal

Misbehaving with Woman Police : महिला पोलिसांना गुंडाची अरेरावी, सूरज नलवडेला अटक; मिरवणुकीतील घटना

Ganesha Procession : गणेश मिरवणुकीदरम्यान महिला पोलिसांशी अरेरावी केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार सूरज नलवडेला अटक झाली आहे.
Published on

कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकीत राजारामपुरीत सराईत गुंडाने थेट महिला पोलिसांना अरेरावी केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. सूरज तानाजी नलवडे (वय ३३, रा. शाहूनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. जनता बाजार चौकातून मिरवणूक पुढे जाण्यास सांगितल्याच्या रागातून त्याने आरेरावी केली होती. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा नोंद करून त्याला अटक केल्याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली.

Loading content, please wait...