NDA Convocation : राष्ट्रपती ब्राँझपदकावर उमटली कोल्हापूरची मोहर, हर्षवर्धन भोसलेची कामगिरी

कोल्हापूरचे रांगडे गडी केवळ कुस्तीच्या मैदानातच नाही, तर खडतर अशा सैन्य प्रशिक्षणातही बाजी मारतात.
NDA Convocation
NDA Convocationsakal
Updated on

कोल्हापूरचे रांगडे गडी केवळ कुस्तीच्या मैदानातच नाही, तर खडतर अशा सैन्य प्रशिक्षणातही बाजी मारतात. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५व्या तुकडीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हर्षवर्धन भोसले याला राष्ट्रपती ब्रॉँझपदकाने खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित केले.

मूळचा कोल्हापूरचा रहिवासी असलेल्या हर्षवर्धनने उत्कृष्ट कामगिरी करत केवळ कुटुंबाची नाही, तर मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली आहे. हर्षवर्धनचे वडील शैलेश हे बॅंकेत रोखपाल असून आई सीमा गृहिणी आहेत. ‘सकाळ’शी बोलताना हर्षवर्धन सांगतो, ‘‘माझे आजोबा अजित भोसले हवाई दलात कार्यरत होते.

लहानपणापासूनच त्यांच्यासारखे बनण्याचे माझे स्वप्न होते. त्यामुळे इयत्ता सहावीत शिकतानाच डेहराडून येथील राष्ट्रीय मिलिटरी कॉलेजच्या प्रवेशासाठी परीक्षा दिली. त्यात माझी नि वड झाली. खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच माझे सैन्य प्रशिक्षण सुरू झाले.’’

सैन्य महाविद्यालयात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे प्रशिक्षण पूर्ण करत हर्षवर्धनने पहिल्या प्रयत्नातच ‘एनडीए’ गाठले. तो पुढे म्हणतो, ‘‘एनडीएतील तीन वर्षांचे प्रशिक्षण अत्यंत खडतर होते. मानसिक, शारीरिक क्षमतेबरोबरच नैतिक प्रशिक्षणही देण्यात आले. मीनौसेनेचा विद्यार्थी असल्याने १६ डिसेंबरला ‘इंडियन नेव्हल ॲकॅडमी’मध्ये पुढील प्रशिक्षणासाठी दाखल होईल.’’

हर्षवर्धनचा विद्यार्थ्यांना सल्ला...

  • आयुष्यात आपले ध्येय निश्चित करा

  • ध्येय नसेल तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही

  • ध्येयप्राप्तीसाठी सातत्याने कष्ट करायला पाहिजेत

  • प्रामाणिक कष्टाला नक्की फळ मिळते

  • कधी निराश होऊ नका, आयुष्यात संघर्षच यशस्वी करतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.