शेट्टी यांनी विनंती फेटाळली, ते मोर्चा काढण्यावर ठाम राहिले, एवढेच नाही तर पायातील हातात घ्या, असेही वक्तव्य केले.
कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti) करीत असलेली वक्तव्ये गैरसमजुतीने आहेत, त्यांच्यासारख्या जबाबदार नेत्याला ती शोभणारी नाहीत, तुम्ही हे बोलणे बरे नव्हे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांनी शेट्टी यांच्या टिकेला पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. जबाबदार नेता म्हणून काम करीत असताना दुसऱ्यांना शिव्या-शाप देणे, चिखलफेक करणे व आरोप करणे बरे नव्हेत, असेही म्हटले आहे.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात (sangli district flood) महापूर आला. त्यात जे नुकसान झाले, त्यानुसार, ७१ हजार, २८९ इतक्या पाणी गेलेल्या घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. प्रत्येकी दहा हजाराप्रमाणे रक्कम खात्यावर वर्गही होत आहेत. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून किती नुकसान भरपाई द्यावयाची, याबाबत निर्णय झालेला नाही. दरम्यान, तोपर्यंत श्री. शेट्टी यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. (political News) मी व पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी निर्णय झालेला नाही. त्यामुळे मोर्चा काढू नये, अशी विनंती केली होती. शेट्टी यांनी विनंती फेटाळली, ते मोर्चा काढण्यावर ठाम राहिले, एवढेच नाही तर पायातील हातात घ्या, असेही वक्तव्य केले.
आमच्यात व स्वाभिमानी संघटनेचे चांगले संबंध असताना अशी वक्तव्ये का? याचे आश्चर्य आम्हाला वाटत आहे. वक्तव्ये करताना कोणाचा अपमान होणार नाही, मने दुखावणार नाहीत, याची दखल नेत्यांनी घ्यावी. राजकारणात चढ-उतार येतात; परंतु दुसऱ्याला शिव्या-शाप देऊन परिस्थिती बदलत नसते. नेते शरद पवारसाहेबांचा उल्लेखही अनाठायी होता, असेही पत्रकात म्हटले आहे.
जरा काळजी घ्या
संघटनेतून तुम्ही आमदार, खासदार झालेले आहात. चळवळी, मोर्चा, आंदोलने, धरणे हा तर संघटनेचा आत्मा आहे. संघटनेचे नेते म्हणून तुमच्याबद्दल लोकांच्या ज्या भावना आहेत त्या बिघडू नयेत, याचीही काळजी घ्या, असा सल्लाही पत्रकात दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.