'शाहू छत्रपती महाराज सर्वांसाठीच आदर्श, पण 'महायुती'च्या उमेदवारासाठी आम्ही हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करू'

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) हे सर्वांसाठी आर्दश व्यक्‍तिमत्त्‍व आहे.
Hasan Mushrif Shahu Chhatrapati Maharaj Loksabha Election Kolhapur
Hasan Mushrif Shahu Chhatrapati Maharaj Loksabha Election Kolhapuresakal
Updated on
Summary

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले तेव्हा जागा किती कोणाला द्यायचे ठरले होते.

कोल्हापूर : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) हे सर्वांसाठी आर्दश व्यक्‍तिमत्त्‍व आहे. आम्हा सर्वांना वाटते त्यांनी निवडणूक लढवू नये. निवडणूक लढवायची की नाही हा त्यांचा वैयक्‍तिक प्रश्न आहे. मात्र, सध्या त्यांचे जे आदराचे स्थान आहे त्याच स्थानावर त्यांनी कायम असावे अशी अपेक्षा आहे, असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुश्रीफ यांच्या हस्ते कामगारांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्या विजयासाठी आम्ही हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी करू असेही मुश्रीफ म्हणाले.

Hasan Mushrif Shahu Chhatrapati Maharaj Loksabha Election Kolhapur
शाहू महाराजांनी लढण्याचा निर्णय घेतलाच, तर मलाही..; 2009 ची पुनरावृत्ती होणार सांगत काय म्हणाले मंडलिक?

आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारी चर्चेचा विषय आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुश्रीफ यांनी भाष्य केले. यापूर्वी त्यांनी कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर शिंदे गटाचा दावा असल्याचे वक्तव्य केले होते.

Hasan Mushrif Shahu Chhatrapati Maharaj Loksabha Election Kolhapur
'सातारा लोकसभा' अजित पवारांकडं? उदयनराजेंनीही व्यक्त केली निवडणूक लढवण्याची इच्छा, संघर्ष होण्याची चिन्हे

ते म्हणाले की, ‘जागा वाटपाबाबत महायुतीच्या तिन्ही पक्षांतील वरिष्ठ नेते एकत्र येऊन जो निर्णय घेतील. ज्या जबाबदारी देतील त्याची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले तेव्हा जागा किती कोणाला द्यायचे ठरले होते. त्यानुसार त्यांच्या पातळीवर निर्णय होतील. महायुतीच्या एका घटक पक्षाचा मी मंत्री आहे. त्यानुसार पक्षांकडून दल्‍या जाणाऱ्या जबाबदारीत मला लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून आणव्याच लागतील.’

शंभर कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. आणखीन रस्ते करण्यासाठी आणखी शंभर कोटींचा निधी मागवला आहे. आयआरबीने ५० किलो मीटरचे रस्ते बनवलेले आहेत. बऱ्याच रस्त्यांची कामे सुरू होतील. त्यामुळे येणाऱ्या काळात रस्ते गुळगुळीत, चांगल्या दर्जाचे होणार आहेत. त्यामुळे हाडांवर उपचार सुविधा करण्याची वेळ येणार नाही, अशी कोपरखळी मुश्रीफ यांनी मारली.

Hasan Mushrif Shahu Chhatrapati Maharaj Loksabha Election Kolhapur
Loksabha Election : 'तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल'; शाहू छत्रपती महाराजांचे सूचक संकेत

कोल्हापूरचे खरे चप्पल समजून येणार

कोल्हापुरी चप्पलमध्ये बनावटगिरी सुरू झाल्याने लौकिकाला बाधा येत आहे. त्यामुळे यापुढील काळात कोल्हापुरी चप्पलला चिफ बसवण्यात येईल. त्यात क्युआर कोड असणार आहे. त्यामुळे भविष्यात कोल्हापूरचे खरे चप्पल सहज समजून येणार आहे. त्यामुळे परदेशातील निर्यातही चांगली होण्यास मदत होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.