चंद्रकांत पाटील यांचे ज्ञान अगाध; मुश्रीफांचा खोचक टोला

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटले - मुश्रीफ
political
politicalesakal
Updated on
Summary

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटले - मुश्रीफ

कोल्हापूर - मागील काही दिवसांपासून कोरोना (Covid -19) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, कोरोना हा रोगचं नसल्याचा चंद्रकांत पाटलांचा (Chandrakant Patil) समज आहे. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. पण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटले, असा खोचक टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांनी लगावला आहे.

political
दिल्लीत बॉम्ब तर पंजाबमध्ये RDX सापडल्यानं खळबळ

शरद पवार हे शॅडो मुख्यमंत्री आहेत असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर मुश्रीफ म्हणाले, शरद पवार यांना अनेक वर्षे मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे. एसटी संपावर त्यांनी तोडगा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या पोटात का दुखावे ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शरद पवार यांच्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas aaghadi sarkar) एकत्र आहे. प्रत्येक पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो, त्यामुळे राष्ट्रवादीही पक्ष वाढवत आहे. पक्ष वाढवण्यासाठी राष्ट्रवादी (NCP) देशभरात उमेदवार उभा करणार आहे, असेही ते म्हणाले.

खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) हे जिल्हा बँकेत पुढाकार घेणार असतील तर भाजपसोबत असेल असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील यांचे ज्ञान आघात आहे. मुळातच विनय कोरे (Vinay Kore) यांचा शिवसेनेच्या बाबासाहेब पाटील यांना विरोध होता. त्यामुळे आमदार विनय कोरे काय भूमिका घेतील? हे वेगळे सांगायची गरज नाही. हे गणित चंद्रकांत पाटलांना कळाले नसेल तर कोल्हापूर (Kolhapur Politics) जिल्ह्याचे राजकारण त्यांना कळले नाही, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

political
...त्यासाठी अकलेची गरज नसते; CM ठाकरेंचा विरोधकांना टोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.