यंदाच्या दिवाळीतील अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्यानेच घालू; मंत्र्यांची ग्वाही  

hasan mushrif kolhapur thet paipline
hasan mushrif kolhapur thet paipline
Updated on

कोल्हापूर - यंदाच्या दिवाळीतील अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्यानेच घालू, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिली. माजी महापौर हसीना फरास यांची नगरसेवक पदाची पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दैवज्ञ बोर्डिंग हाऊस येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक आदिल फरास, हसीना फरास, शारगंधर देशमुख, सचिन पाटील, सचिन चव्हाण, निवास शिंदे, अनिल इंगवले, अच्युत साळोखे आदी उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाची स्थगिती उठेपर्यंत नोकर भरती करू नये अशी मराठा समाजाची मागणी आहे, मात्र अन्य समाज एसईबीसी कोट्यातील जागा राखीव ठेवून नोकर भरती करावी अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे.’’

मुश्रीफ म्हणाले, ‘‘मी तसेच सतेज पाटील यांनी या दिवाळीची आंघोळ थेट पाईपलाईनच्या पाण्यानेच तुम्हाला घालू अशी शपथ घेतली आहे. पाचशे कोटीची योजना आणणे सोपे काम नव्हते. माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर मला टीका करायची नाही; मात्र विविध विभागांचे ना हरकत दाखला देताना अडवणूक केली. तीनशे कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा पूर्ण करायचा आहे. सत्तेत नसल्यामुळे काही मर्यादा आल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या चाणक्‍य नीतीमुळे महाविकास आघाडी अस्तित्वात आली. मी तसेच सतेज पाटील यांनी ४७ कोटींचा निधी आणला. एकही आरक्षण उठविले नाही. महापालिका निवडणूक मैत्रीपूर्ण लढणार आहोत. हसीना फरास यांनी प्रभागात चांगले काम केले. येत्या निवडणुकीसाठी आदिल यास आशीर्वाद असावा.’’

आदिल फरास यांनी महालक्ष्मी मंदिर प्रभाग आणि फरास परिवाराचे नाते राजकारणाच्या पलीकडील असून विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात असून आपल्या आशीर्वादाची गरज असल्याचे नमूद केले. आर. के. पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.

दादांनी रुपयाही दिला नाही
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सत्तेत असताना ते शहरासाठी रुपयाही देऊ शकले नाहीत. त्यामुळे पालिका निवडणुकीत भाजपला मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. शहर चांगले झाले पाहिजे, पर्यटकांचा ओढा वाढला पाहिजे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले. तीनशे कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा पूर्ण करायचा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
 
संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.