विरोधकांना डावलून विकास होणार नाही ; मंत्री मुश्रीफ 

hasan mushrif minister speech kolhapur zilla parishad
hasan mushrif minister speech kolhapur zilla parishad
Updated on

कोल्हापूर - जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर केवळ सत्ताधारी सदस्यांना निधी देऊन व विरोधकांना डावलून विकास होणार नाही. त्यामुळेच पुढील काळात ग्रामविकास विभाग असो की जिल्हा नियोजन मंडळातून येणारा निधी सर्वच सदस्यांना समान निधी दिला जाईल, असे आश्‍वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार जयंत आसगावकर, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. 

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ""लोकशाहीत मोर्चा काढणे नागरिकांचा अधिकार आहे. मात्र सतत मोर्चा काढणे व आंदोलन करण्याने जिल्ह्याची ओळख बदलत आहे. मात्र मुश्रीफ व आपण जनता दरबारचा संकल्प केला आहे. लोकांचे प्रश्‍न या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न असून त्याला प्रतिसाद मिळत आहे.'' 

कागल, करवीर जिल्हा... 
हसन मुश्रीफ व सतेज पाटील दोन्ही मंत्री ताकतीचे आहेत. विकासकामांचा मोठा आवाका आहे. मात्र मंत्री असल्याने निधीचा पूर या दोन्ही तालुक्‍यांकडेच आहे. दांडा तिकडे खोरं ओढतं, हे खरं असलं तरी इतर तालुक्‍यांनाही संधी मिळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे आता कागल व करवीर हे दोन्ही तालुक्‍यांची जिल्हा म्हणून घोषणा करावी म्हणजे इतर तालुक्‍यांनाही निधी मिळेल, असा टोला खासदार धैर्यशील माने यांनी लगावला. त्यांच्या या वक्‍तव्याला सभागृहाने भरभरून दाद दिली. 

राजकारणाची पाठशाळा 
जिल्हा परिषद राजकारणाची पाठशाळा आहे. जिल्ह्याचे विविध प्रश्‍न समजून घेता आले. राजू शेट्टी सदस्य असताना सतत उसाच्या प्रश्‍नावर लक्ष वेधायचे. पुढे ते संसदेत गेले. धैर्यशील माने यांनाही संसदेत जाण्याची संधी मिळाली. आपणालाही जिल्हा परिषदेच्या अनुभवाचा फायदा विधानसभेत काम करताना होत आहे. त्यामुळे या सभागृहात येणाऱ्या सदस्यांनी अभ्यासपूर्ण काम करावे, असे आवाहन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. 

विधान परिषद असल्याने भरपूर निधी 
यावर्षी विधानपरिषद निवडणूक पालकमंत्री सतेज पाटील लढवणार आहेत. त्यामुळे सदस्यांच्या मतांची गरज आहे. म्हणूनच या वेळी जिल्हा नियोजनकडून भरपूर निधी दिला जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला. 
 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.