काळम्मावाडीच्या पाण्यावर इचलकरंजीकरांचा डोळा आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल.
सिद्धनेर्ली : इचलकरंजीवासीयांना (Ichalkaranji) सुळकूड (Sulkud Water Scheme) येथून पाणी दिल्यास काळम्मावाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून उद्रेक होईल. त्यामुळं इचलकरंजीकरांनी योजनेसाठी कागलमध्ये येण्याचं धाडस करू नये, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडं पाठपुरावा करुन ही योजना रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असंही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले. बामणी (ता. कागल) येथे साडेआठ कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ व लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय घाटगे होते. यावेळी सदा साखरचे नूतन संचालक विष्णू बुवा, सेवानिवृत्त बँक निरीक्षक शिवाजीराव मगदूम, सर्पमित्र भीमराव शिंदे, शुभम गवळी, गुणवंत विद्यार्थी समर्थ पाटील, प्रज्वल पाटील, अभिषेक माने, ओंकार माने, विनय पाटील, प्रथमेश पाटील, अंजिक्य मगदूम यांचा सत्कार झाला.
खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, 'काळम्मावाडीच्या पाण्यावर इचलकरंजीकरांचा डोळा आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे तालुक्यातील नेतेमंडळी व शेतकरी ही योजना रद्द करण्यासाठी एकत्र आलो आहोत.' घाटगे म्हणाले, 'काळम्मावाडी धरणासाठी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्याग केला आहे. त्यामुळे या पाण्यावरील विस्थापितांसह शेतकऱ्यांचा हक्क अबाधित राखूया.'
ग्रामपंचायत सदस्या कोमल बुवा, भीमराव शिंदे, मनीषा पाटील, युवराज पाटील, नेताजी बुवा, तानाजी मगदूम यांनीही मनोगत व्यक्त केले. विष्णू बुवा, माजी सरपंच रावसाहेब पाटील, शिवाजी मगदूम, पी. आर. पाटील, युवराज कोईगडे, मारुती पाटील, नारायण पाटील उपस्थित होती. स्वागत बाबुराव मगदूम यांनी केले. आभार अरविंद मगदूम यांनी मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.