16 हजारांची लाच घेताना हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; गुटखा विक्रीप्रकरणी दुकानदाराकडे मागितली होती लाच

Hatkanangle Police Station : शिंदेला तक्रारदाराकडून सोळा हजार रुपये घेताना पकडण्यात आले.
Hatkanangle Police Station
Hatkanangle Police Stationesakal
Updated on
Summary

तुमच्यावर कायदेशीर कारवाई न करता गुटखा विक्री करायची असेल, तर मला प्रति महिना दहा हजार रुपये द्यावे लागतील; अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करतो, असे धमकावले.

हातकणंगले : हातकणंगले पोलिस ठाण्यातील (Hatkanangle Police Station) हवालदार रविकांत विक्रांत शिंदे (वय ५०, रा. पाच तिकटी, हातकणंगले, मूळ गाव फणसवाडी, ता. भुदरगड) याला १६ हजारांची लाच घेताना ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई हातकणंगले पोलिस ठाण्यातच करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.