Health : बाळंतपणानंतर मानसिक विकारांचे प्रमाण वाढले, पोस्टपार्टम डिप्रेशनचा प्रकार; सौम्य औषधोपचार, समुपदेशनानंतर जगणे सुसह्य

सौम्य औषधोपचार आणि समुपदेशनानंतर ती पुढच्या एका महिन्यातच पूर्वीसारखी हसरी झाली. बाळंतपणानंतर महिलांना होणाऱ्या या आजाराचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
Health
HealthSakal
Updated on

Health - संगीता छान मनमिळावू, तसेच हसरी आणि बोलकी, अगदी गरोदरपणातले नऊ महिनेही तिने असेच हसत खेळत ‘एन्जॉय’ केले. बाळंतपणानंतर मात्र तिच्या चेहऱ्यावरील हसरेपणाच मावळला. प्रसूती नॉर्मल झाली, बाळही सुदृढ आहे, मग इतकी उदास का, असा प्रश्‍न घरच्यांना पडू लागला.

Health
Pune Parking : कर्वे रस्त्यावर पार्किंगचे बोर्ड लावण्यास महापालिकेची टाळाटाळ

एका महिन्यानंतर हा प्रकार आणखीच वाढला. तिला कायम भीती वाटू लागली, अस्वस्थता जाणवू लागली, झोप लागेनाशी झाली याहीपलीकडे बाळाची काळजीही नीट घेता येईना. शेवटी तिला घरच्यांनी डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यास सांगितले. त्यांच्याकडे गेल्यानंतर मात्र तिला पोस्टपार्टम डिप्रेशनने घेरल्याचे लक्षात आले.

Health
Mumbai Crime : कसारा स्थानकातून सराईत दरोडेखोराला अटक, एक चाकू व मोबाईल हस्तगत करण्यात आला

सौम्य औषधोपचार आणि समुपदेशनानंतर ती पुढच्या एका महिन्यातच पूर्वीसारखी हसरी झाली. बाळंतपणानंतर महिलांना होणाऱ्या या आजाराचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. पूर्वी हेच प्रमाण ८ ते १० टक्क्यांपर्यंत होते. गरोदरपण व बाळंतपणात महिलेच्या शारीरिक काळजीसोबत मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असते.

Health
Pune Crime : महाविद्यालयाजवळ पानटपरीत गांजा विक्री करणाऱ्यास अटक

या काळात झालेल्या हार्मोनल बदलांमुळे गरोदरपणातच तसेच बाळंतपणानंतर लगेचच काही मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातून अनामिक भीती वाटणे, मन चंचल होणे, कामात लक्ष न लागणे, चिडचिडेपणा, अस्वस्थता, उदास-निराश वाटणे, एकलकोंडेपणा वाढणे, हतबलता वाढणे व झोप न लागणे, अशी लक्षणे दिसू लागतात. अशावेळी बऱ्याचदा कुटुंबाकडून ती मुद्दाम करते, म्हणून दुर्लक्ष केले जाते. असे न करता बाळंतपणानंतर महिन्याभरातच अशी लक्षणे दिसू लागताच त्या मातेला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारासाठी नेले पाहिजे.

का वाढले प्रमाण?

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीमुळे बाळाला सांभाळण्यासाठी घरात जवळचे नातेवाईक आहेत, अशी भावना नव्या मातेच्या मनात आपसूकच येत होती. हल्ली विभक्त कुटुंबात पती-पत्नींशिवाय दुसरे बाळासाठी कोण नाही, अशी परिस्थिती आहे. अशा वेळी नोकरी, घरासोबत बाळाची जबाबदारी घेता येईल का, अशी एक भीती मातेच्या मनात घर करू लागते. त्यामुळे याचे प्रमाण वाढल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.

Health
Mumbai Police : मुंबई पोलिसांनी केला हजारो महिलांच्या तक्रारीचा निपटारा

ही आहेत लक्षणे

अनामिक भीती वाटणे

मन चंचल होणे

कामात लक्ष न लागणे

छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडचिड होणे

अस्वस्थ वाटणे

उदास व निराश वाटणे

एकलकोंडेपणा वाढणे

हतबलता निर्माण होणे

झोप न लागणे

बाळाकडेही लक्ष देता न येणे

मातेला ज्यावेळी असे मानसिक त्रास जाणवू लागतात. त्यावेळी तिला मानसिक आधार दिला पाहिजे. तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. गरोदरपणापासून मातेने थोडासा वेळ स्वतःसाठी देणे गरजेचे आहे. योगासने, व्यायामासोबतच छंदही जोपासला पाहिजे.

- डॉ. निखिल चौगुले, मानसोपचारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.