Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा पावसाने झोडपले; पाच ठिकाणी कोसळली वीज, लाखो रुपयांचे नुकसान

Kolhapur Rain : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील अंजली भानुदास मसराम यांच्या घरावर वीज कोसळली.
Kolhapur Rain
Kolhapur Rainesakal
Updated on
Summary

पन्हाळा तालुक्यातील पडळ व यवलूज परिसरात शुक्रवारी दुपारी तीन ठिकाणी वीज कोसळल्याने मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.

कोल्हापूर : विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने शुक्रवारी जिल्हाभर धुवाधार (Kolhapur Rain) हजेरी लावली. त्या दरम्यान पाच ठिकाणी वीज कोसळली. त्यात शहरातील नागाळा पार्क, उजळाईवाडी तसेच पन्हाळा तालुक्यातील पडळ व यवलूज या ठिकाणांचा समावेश आहे. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.