Ghat News : दक्षिण भारतातील राज्यांत जात असाल, तर थांबा! 'या' घाटातून अवजड वाहतुकीला आहे बंदी

Tilari Ghat : तिलारी घाट कोकण आणि घाटमाथ्याला जोडतो. दक्षिण भारतातील राज्यांना गोव्याला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरतो.
Tilari Ghat Chandgad
Tilari Ghat Chandgadesakal
Updated on
Summary

घाटमाथ्यावरील महाराष्ट्र, कर्नाटकापासून ते केरळ, तमिळनाडू, आदी राज्यांतील अवजड वाहतूकदार जवळचा मार्ग म्हणून याच रस्त्याची निवड करतात.

चंदगड : तिलारी घाटातून (Tilari Ghat) अवजड वाहतुकीला असलेली कागदोपत्री बंदी आता लोखंडी कमान उभी करून प्रत्यक्षात आणली आहे. सूचना देऊनही अवजड वाहनधारक घाटातून वाहतूक करतात. यामुळे अनेकदा अपघात घडतात आणि वाहतुकीवर परिणाम होतो. सातत्याने घडणाऱ्या या प्रसंगांना ब्रेक लावण्याच्या हेतूने सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) आता लोखंडी कमान उभी केली आहे.

तिलारी घाट कोकण आणि घाटमाथ्याला जोडतो. दक्षिण भारतातील राज्यांना गोव्याला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरतो. घाटमाथ्यावरील महाराष्ट्र, कर्नाटकापासून ते केरळ, तमिळनाडू, आदी राज्यांतील अवजड वाहतूकदार जवळचा मार्ग म्हणून याच रस्त्याची निवड करतात. अलीकडे अवजड वाहतुकीचे प्रमाण वाढले होते. गुगल मॅपवरून (Google Map) दिसणाऱ्या मार्गाचा आधार घेत वाहनधारक या मार्गाने वाहन रेटतात.

Tilari Ghat Chandgad
कृष्णेच्या महापुरात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून आठजण बुडाले; अकिवाटच्या सरपंच पतीचा मृत्यू, 'अशी' झाली दुर्घटना

मात्र, घाटातील यू आकाराची वळणे, एकाच वेळी चढाव आणि तीव्र उतारामुळे अंदाज येत नाही. त्यात जास्त लांबीचे वाहन असल्यास या वळणावर ते वळण घेऊ शकत नाही. ते घाटात अडकते. वाहन पुढे-मागे करण्याच्या नादात ते दरीत कोसळण्याचीही भीती असते. असे वाहन अडकले की इतर वाहतूकही खोळंबते. क्रेन मशीन मागवून अडकलेले वाहन बाजूला करेपर्यंत मोठा वेळ जातो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील अवजड वाहतुकीला बंदी घातली होती. तरीही अनेकजण या मार्गावरून प्रवास करीत असत. त्यातून सातत्याने अपघात घडू लागल्याने बांधकाम विभागाने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोखंडी कमान उभी केली आहे. अवजड वाहन त्यातून पुढे जाऊ शकत नाही.

Tilari Ghat Chandgad
ED Raid : भाजप आमदाराविरोधात भ्रष्टाचाराची याचिका दाखल करणाऱ्या देशमुखांच्या घरावर ED चा छापा; आज मायणी बंदची हाक

अवजड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोखंडी अडथळा उभा करणे हाच पर्याय होता. शासनाने तो प्रस्ताव मान्य केल्यामुळे घाटाच्या दोन्ही बाजूंनी कमान उभी केली आहे. तीन मीटरपेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना अटकाव केला आहे.

-इफ्‍तिकार मुल्ला, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम, चंदगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.