Heritage of Kolhapur: मेरी वॉलनेस हॉस्पिटल : आरोग्यसेवेचा वारसा

heritage of kolhapur Mary Wellness Hospital information uday gaikwad
heritage of kolhapur Mary Wellness Hospital information uday gaikwad
Updated on

कोल्हापूर : डॉ. विलियम वॉलनेस व त्यांच्या पत्नी मेरी वॉलनेस हे दोघे सांगलीच्या मिशन दवाखान्यात ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हे तत्त्व मनात घेऊन रुजू झाले. मिशन दवाखान्यात गोरगरिबांना मोफत उपचार, सवलतीच्या दरात औषधे देण्याचे मिशनने ठरवले होते. सर्व जाती धर्माचे लोक इथे उपचार घेण्यासाठी येत. तिथे महारोग्यांसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली. मिरज मेडिकल सुरू केले. १९०६ मध्ये त्यांच्या पत्नी कॉलरा झाल्याने मृत्यू पावल्या. सुरवातीच्या काळातील नर्सिंगचे त्यांच्या कामाबाबत छत्रपती शाहू महाराजांना आदर होता. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर येथील सध्याच्या ताराराणी चौक परिसरातील बंगल्यासह असलेले जुने मिलिटरी हॉस्पिटल, बंगला, आजू बाजूची तेरा एकर जागा डॉ. वॉलनेस यांना दिली.
 

सदर बझार हा ब्रिटिश छावणीचा परिसर आणि त्यांच्यासाठी बरॅकमध्ये मिलिटरीचे हॉस्पिटल होते. इथल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी धर्मगुरू असलेले फादर कॉवेल नियमित येत असत. त्यांच्या प्रभावाने खूप लोक आदर करीत. त्यांचे नाव घेताना अपभ्रंश होऊन कावळे असे झाले असावे. ते राहात असलेलं घर व काही बरॅक दुरुस्त करून इथे हॉस्पिटल सुरू झाले. त्यांच्यामुळे आजही कावळा नाका अशी ओळख राहिली आहे.येथे स्त्रियांसाठी, लहान मुलांसाठी व नेत्र उपचारासाठी हॉस्पिटल सुरू करावे, अशी विनंती केली. आवश्‍यक बदल व दुरुस्ती करण्यासाठी महाराजांनी तीन हजार रुपये दिले. हॉिस्पटलला मेरी वॉलनेस यांचे नाव देऊन त्यांचे उचित स्मारक केले.

१९०९ ते १९३१ मध्ये डॉ. मिस व्हिक्‍टोरिया मॅक अर्थर यांनी काम केले. त्यांच्या कामासाठी त्यांना इंग्लडच्या राजाने ‘केसर ए हिंद’ असे पदक दिले. १८९८ च्या प्लेग साथी दरम्यान मेरी वॉलनेस हॉिस्पटलमध्ये खूप लोकांची सेवा केली गेली.डॉ. नार्मा डनिग या रुग्णसेवा करण्यासाठी १९३० मध्ये दाखल झाल्या. १९६६ पर्यंत त्यांनी ३६ वर्ष अखंड सेवा दिली. चाळीस हजार स्त्रियांची सुखरूप बाळंतपण करणाऱ्या डनिग बाई कोल्हापूरमधील राजघराणे, सरदार व इतर सामान्य अशा सर्वांना सेवा देण्यामुळे सर्व परिचित झाल्या होत्या. स्त्री रोगतज्ज्ञ असलेल्या या विदुषीच्या नावानं हा दवाखाना ‘डनिग बाईंचा दवाखाना’ म्हणूनही ओळखला जात होता. सध्या चर्च कौन्सिलमार्फत हे हॉस्पिटल सुरू आहे.दोन पिढ्यातील अनेकांचा जन्म झालेल्या या ठिकाणाला वारसास्थळाचा दर्जा आहे. सेवाभावाने भारावलेला हा परिसर मदत, सेवा, सुश्रूषा अशा मूल्यांसह वारसामूल्य म्हणून जपले पाहिजे.

शाहू महाराजांकडून मिरज मेडिकलसाठी जमीन १९०३ मध्ये शिकारी दरम्यान महाराजांना गंभीर इजा झाली. डॉ. वॉलनेस यांनी मिरज येथे ऑपरेशन व उपचार केल्यानंतर  महाराज परतले. त्यानंतर डॉक्टर मात्र रोज कोल्हापूरला ड्रेसिंग करायला येत. त्यातून स्नेह आणि विश्वास दृढ झाला. मिरजेतील दवाखाना कोल्हापूरमध्ये सुरू करावा आणि दरबार सर्जन म्हणून काम पाहावे, अशी इच्छा महाराजांनी त्यांना व्यक्त करून दाखविली. ती डॉक्‍टरांनी नाकारली. त्याचे स्वागत करून महाराजांनी मिरज मेडिकलसाठी सात एकर जमीन दिली. आपल्या मुलांना शिकण्यासाठी मिशन स्कूलमध्ये घालून इतर मुलांना तिथे पाठवण्याबाबत आग्रही राहिले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.