विमानतळाहून अंबाबाई दर्शनासाठी त्यांचा ताफा येणार आहे. यानंतर वारणानगर कोडोली तेथील नियोजित कार्यक्रमासाठी जाणार आहेत.
कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी (ता. २) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपतींच्या (President Droupadi Murmu) वाहनांचा ताफा विमानतळाहून शहरात येताना काही वेळासाठी इतर वाहतूक थांबविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या अंबाबाई दर्शनावेळी (Ambabai Darshan) शहरातील प्रमुख एकेरी मार्ग शिथिल करून या मार्गाने वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. वाहनाचा ताफा जाणाऱ्या ७ मार्गांवर वाहने थांबण्यास मनाई केली आहे.