Kagal : आक्षेपार्ह स्टेटसमुळं कागलमध्ये तणाव; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पोलिसांचं शांततेचं आवाहन

आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे रविवारी (ता. ११) कागल शहरात तणाव निर्माण झाला होता.
Hindu Association Aggressive in Kagal
Hindu Association Aggressive in Kagalesakal
Updated on
Summary

या घटनेचे तीव्र पडसाद कागलमध्ये सोशल मीडियावर उमटले. त्यातून तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले.

कागल : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे रविवारी (ता. ११) कागल शहरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. हिंदुत्ववादी संघटनांकडून (Hindu Association) आठवडी बाजारासह काल कागल बंद पुकारण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर कागल बंद रात्री मागे घेण्यात आला.

त्यामुळे कालचा आठवडी बाजार व येथील व्यापार नेहमीच्या वातावरणात सुरळीत पार पडला. दरम्यान, या तरुणावर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन विविध संघटनांकडून देण्यात आले. कागल मुस्लिम जमियतने (Kagal Muslim Jamiat) स्टेटस लावणाऱ्या तरुणाच्या वडिलांचे सभासदत्व एक वर्षासाठी रद्द केले.

Hindu Association Aggressive in Kagal
Kolhapur Riots : 'चिंता, फूटपाड्या उद्योगांना साथ मिळण्याची'; वाचा 'कोल्हापूर दंगली'वर परखड भाष्य करणारा लेख

येथील एका तरुणाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे रविवारी कागल शहरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी कागल पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद कागलमध्ये सोशल मीडियावर उमटले. त्यातून तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले. आज हिंदुत्ववादी संघटनांकडून आठवडी बाजारासह कागल बंद पुकारण्यात आला होता. मात्र पोलिसांनी सर्वधर्मीय नागरिकांची व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला.

Hindu Association Aggressive in Kagal
Kolhapur Riots : दंगलीनंतर मुस्‍लिम बोर्डानं घेतला मोठा निर्णय; 200 मशिदींतून मौलवींनी केलं 'हे' आवाहन

कागल बंद रात्री उशिरा मागे घेण्यात आला होता. सोमवारी सकाळी शहरात तणावपूर्ण वातावरण होते. व्यापारी बंद आहे की नाही अशा द्विधा मनस्थितीत दुकानासमोर येऊन थांबले होते. पोलिसांनीही नियंत्रणासाठी आपला बंदोबस्त वाढवला होता. चौकाचौकांत पोलिस उभे होते. बसस्थानक ते गैबी चौक या मार्गावरील व्यापारी दुकान उघडायचे की नाही या मनस्थितीत उभे होते. वातावरण शांततापूर्ण असल्याची खात्री करून एकेक दुकानदाराने आपले दुकान उघडायला सुरुवात केली.

Hindu Association Aggressive in Kagal
Buldhana : ..तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन विसाव्या मजल्यावरून उड्या मारू; रविकांत तुपकरांचा थेट इशारा

त्यानंतर ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी आणलेला भाजीपाला मांडण्यास सुरुवात केली. त्यातून वातावरण निवळत गेले. अकराच्या सुमारास काही संघटनांनी एकत्र येऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याची सूचना करत निवेदन स्वीकारून त्यांना जाण्यास सांगितले.

Hindu Association Aggressive in Kagal
Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत भाजप 350 जागा जिंकणार; उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

त्यानंतर दुपारी बारानंतर कागल शहर पूर्वपदावर आले. त्यामुळे आजचा आठवडी बाजार व येथील व्यापार नेहमीच्या वातावरणात सुरू झाला. ग्राहकांनी नेहमीप्रमाणे दुपारनंतर बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. शहरातील व्यवहार सकाळपासून सुरळीत सुरू होते. दरम्यान, संबंधित तरुणावर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांना देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.