मुळात प्रदूषणाचा हा आंतरराज्य प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटकातील संस्था असल्याने महाराष्ट्र शासनाच्या यंत्रणेला कारवाई करण्याच्या मर्यादा आहेत.
गडहिंग्लज : कर्नाटकातील साखर कारखाना (Sugar Factory in Karnataka) आणि नगरपरिषद या संस्थांमुळे हिरण्यकेशी नदी (Hiranyakeshi River) प्रदूषित होत असल्याचे उघड झाले आहे; परंतु केवळ सीमावादामुळे या प्रश्नाचे गांभीर्य ना महाराष्ट्र घेत आहे, ना कर्नाटक शासन घेत आहे. या दोन संस्थांच्या माध्यमातून प्रदूषित होणाऱ्या नदीच्या पाण्यामुळे महाराष्ट्रवासीयांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा संताप चार गावच्या ग्रामस्थांमध्ये आहे. त्याचा उद्रेक जलसमर्पण आंदोलनातून दिसून आला.