जाचक कायद्याला विरोध करत पुणे-बंगळूर महामार्गावर ट्रकचालकांचा चक्काजाम; निपाणीजवळ रोखली वाहनं

ट्रकचालकांबाबत जानेवारीपासून केंद्र सरकारने (Central Government) नवीन कायदे लागू केले आहेत.
Pune-Bangalore Highway
Pune-Bangalore Highwayesakal
Updated on
Summary

महामार्गावर तासभर वाहने रोखल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासभराने अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

निपाणी : ट्रकचालकांबाबत जानेवारीपासून केंद्र सरकारने (Central Government) नवीन कायदे लागू केले आहेत. अपघातानंतर ट्रकचालक जखमींना मदत करण्याऐवजी निघून जात असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा कायदा आहे. हा कायदा जाचक असल्याचा आरोप करत संतापलेल्या ट्रकचालकांनी यमगर्णी येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्ग (Pune-Bangalore Highway) रोखून चक्काजाम आंदोलन केले.

तसेच, केंद्र सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून घोषणाबाजी करण्यात आली. महामार्गावर तासभर वाहने रोखल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासभराने अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. महामार्ग रोखल्याने प्रवासी, मजूर व कामगारांची गैरसोय झाली.

Pune-Bangalore Highway
जयश्रीताईंनी अजितदादांची भेट घेताच जयंत पाटलांनी गाठला मदनभाऊंचा बंगला; राजकीय चर्चांना आलं उधाण

महामार्ग रोखल्यामुळे बरीच वाहने नांगनूर-श्रीपेवाडीमार्गे निपाणीकडे येत होती. त्यामुळे नांगनूर येथील नागरिकांना सुसाट वाहनांसह धुळीचा सामना करावा लागला. महामार्ग सोडून इतर मार्गाने बस जात असल्यामुळे बसमधील प्रवाशांनाही काही कळेनासे झाले होते. यमगर्णी-श्रीपेवाडी या मार्गावरून सध्या ऊस वाहनांची सातत्याने वर्दळ सुरू आहे. अशातच खेड्यातून अवजड वाहने, बसेस, ट्रक येत असल्यामुळे अधून-मधून वाहतूक कोंडी निर्माण होत होती.

Pune-Bangalore Highway
D. K. Shivakumar : आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा मोठा कट; CBI ने नोटीस बजावताच उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

बैलगाडीधारकांची कसरत

ऊस वाहतुकीसाठी खेडेगावात बैलगाड्या सुरू आहेत. महामार्गावरील वाहने नांगनूर-श्रीपेवाडीमार्गे आल्यामुळे या बैलगाडीधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. वाहतूक विरळ झाल्यावर बैलगाड्या घेऊन जाव्या लागल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.