इचलकरंजी (कोल्हापूर) : सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील तरुणांना अश्लील प्रलोभन दाखवून जवळीक साधली जात आहे. मग त्यांनी केलेल्या कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार घडत आहेत. या हनी ट्रॅपच्या विळख्यात शहरातील २५ पेक्षा अधिक तरुण ओढले गेले आहेत, मात्र समाजात बदनामी होईल, या उद्देशाने असे प्रकार उघडकीस येताना दिसत नाहीत. त्यामुळे तरुण मानसिक व शारीरिक छळ केल्याने आत्महत्येसारख्या टोकाचे पाऊल उचलण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
असे आहे ट्रॅपचे स्वरूप
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘हनी ट्रॅप’च स्वरूप बदलले आहे. पूर्वी ‘हनी ट्रॅप’ लावणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटत असे. आता मात्र फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम व विविध चॅट ॲप अशा वेगवेगळ्या माध्यमांतून सावध हेरले जात आहे. अनेकदा प्रत्यक्ष न भेटता ऑनलाइन फसवणूक केली जाते किंवा त्याला जाळ्यात अडकवले जाते. अश्लील फोटो पाठवून ते आपले असल्याची खात्री समोरच्याला पटवली जाते. त्याची खात्री पटली की त्यालाही तसे फोटो पाठवण्यास सांगितले जात आहे. एखाद्याने हे फोटो पाठवले की मग तो अलगद या ‘ट्रॅप’मध्ये सापडतो. तेथून मग पैशांची मागणी अथवा मानसिक छळाला सुरवात होते.
असा लावला जातो ‘ट्रॅप’
एखादा क्रमांक शोधून त्यावर स्वतःची जुजबी माहिती देणारा पहिला मेसेज टाकला जातो. कुतूहल म्हणून एखाद्याने त्यास प्रतिसाद दिला की मग गोड बोलून जवळीक साधली जाते. मग पूर्वी केलेल्या अश्लील संभाषणाचा वापर करून खंडणी मागितली जाते.
फसवणूक टाळण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी जवळीक साधू नये. तरीही अशाप्रकारे आपली फसवणूक झाली असेल तर तत्काळ पोलिसांत फिर्याद दाखल करावी. योग्य तपास करून कारवाई केली जाईल.
- श्रीकांत पिंगळे, पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.