Kolhapur Assembly Election : विधानसभेचे राजकारण : उमेदवारी देताना नेत्यांचा कस

लोकसभेप्रमाणेच विधानसभेला महायुती व महाविकास आघाडीच एकत्रित लढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या विजयाने काँग्रेसची बाजू मजबूत झाली आहे.
Kolhapur Assembly Election
Kolhapur Assembly Election Sakal
Updated on

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीत राज्यभर महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहता, कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत प्रचंड अस्वस्थता आहे, तर महाविकास आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उमेदवारी देताना दोन्ही आघाड्यांत नेत्यांचा कस लागणार आहे.

लोकसभेप्रमाणेच विधानसभेला महायुती व महाविकास आघाडीच एकत्रित लढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या विजयाने काँग्रेसची बाजू मजबूत झाली आहे.

परिणामी या लोकसभा मतदार संघातील सर्वच मतदार संघांत आता महाविकासच्या उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी शड्डू ठोकण्यास सुरुवात केली आहे. एक-दोन मतदार संघांचा अपवाद वगळता महायुतीतही काही मतदार संघात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरी रोखण्याचे आव्हान नेत्यांसमोर असेल.

Kolhapur Assembly Election
Kolhapur News : सीमाभागातून मिरजमार्गे गांजा कोल्हापुरात; इचलकरंजी बनतेय रॅकेटचे केंद्र

सद्य:स्थितीत जिल्ह्यातील दहापैकी चार मतदार संघांत काँग्रेसचे, दोन मतदार संघांत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, एका मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे, तर इचलकरंजी, शिरोळ व पन्हाळा-शाहूवाडीत अपक्ष आमदार आहेत.

अपक्षांपैकी शिरोळचे राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आवाडे आणि ‘जनसुराज्य’चे डॉ. विनय कोरे हे सद्य:स्थितीत महायुतीसोबत आहेत. जागा वाटपात या जागा संबंधितांनाच सोडल्या, तर या मतदार संघातील महायुतीतील अन्य इच्छुकांची कोंडी शक्य आहे.

Kolhapur Assembly Election
Kolhapur Tour : फक्त खायलाच नाही तर फिरायला देखील कोल्हापूरमधील ठिकाणं आहेत लय भारी..!

अशीच स्थिती महाविकास आघाडीची आहे. हातकणंगले, इचलकरंजी, चंदगड, राधानगरी-भुदरगडमध्ये आघाडीकडे इच्छुक जास्त आहेत, त्याठिकाणी उमेदवारी देताना ‘इलेक्टीव्ह मेरीट’चा विचार करताना, नेत्यांची दमछाक होणार आहे.

आघाडीत कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर व हातकणंगलेत विद्यमान आमदार काँग्रेसचे असल्याने या जागा त्यांना सोडल्या तर उत्तर, दक्षिण व करवीरमध्ये फारशी बंडखोरी होण्याची शक्यता नाही. पण, हातकणंगलेत शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राजीव आवळे यांची भूमिका निर्णायक असेल.

Kolhapur Assembly Election
Assembly Election : ...तर विधानसभेला गुलाल रुसेल; मनोज जरांगे

एखाद्याला थांबवायचे म्हटल्यास राजकीय आयुष्यातील पाच वर्षे त्यांची वाया जाणार आहेत. मग अशांकडून पर्यायांचा विचार होऊ शकतो. महायुतीतही राधानगरी, चंदगड, कोल्हापूर उत्तर, शिरोळ, कागलमध्येही उमेदवारीवरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

विद्यमान आमदारांनाच संधी द्यायची झाल्यास इचलकरंजी, राधानगरी, कागल, चंदगड, उत्तर, शिरोळमध्ये महायुतीत बंडखोरीची शक्यता अधिक आहे. शाहूवाडीत डॉ. कोरे आणि त्यांच्या विरोधात पारंपरिक विरोधक म्हणून माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर ही लढत वगळता अन्य मतदार संघात उमेदवार ठरवताना जिल्हा आणि राज्य पातळीवरील पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार, हे नक्की आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.