सतेज पाटलांसाठी कायद्याचं शिक्षण घेणारा तरुण पोहोचला थेट दिल्लीत

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
satej patil latest political news
satej patil latest political newssakal
Updated on
Summary

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात अनेक राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. यातच काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याच संबंधित आता एक वेळी बातमी समोर आली आहे. एका तरूणाने थेट दिल्ली गाठत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. या तरुणाने माजी मंत्री सतेज पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद द्यावे, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या घरी आणि इतर वरिष्ठ नेत्यांना दिलं आहे.

ऋतिक घागरे हा तरुण सतेज पाटील यांच्यासाठी दिल्लीत पोहचला असून त्याने ट्विट करत ही माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी कॉंग्रसेच्या वरिष्ठ नेत्यांना भेटल्याचा दावा केला आहे. राहुल गांधी यांचे निवासस्थान व काँग्रेस मुख्यालयात गेल्याचेही सांगत त्याने मुख्यालयाबाहेरील फोटोही ट्विट केला आहे.

satej patil latest political news
'अशोक स्तंभावरील सिंह स्वतंत्र भारतातील, गरज पडल्यास डरकाळीही फोडेल'

काय आहे ऋतिक घागरेचं ट्वीट?

'आज नवी दिल्ली येथे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी 12 तुगलक लेन येथे पत्र देऊन तर AICC चे महासचिव व संघटन प्रभारी के. सी वेणुगोपाल यांना AICC office मध्ये प्रत्यक्ष भेटून काँग्रेसचा वैचारिक कार्यकर्ता म्हणून सतेज पाटील यांना महाराष्ट्र काँग्रेस चे अध्यक्ष करावे अशी विनंती केली,' असं घागरे याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

सतेज पाटील यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले गेले. त्याची व्यवस्थितपणे उत्तरं दिली. माझी पार्श्वभूमी, शिक्षण व दिल्लीत कसा आलास याबद्दलही वेणुगोपाल यांनी विचारपूस केल्याचा दावा घागरे याने केला आहे. वेणुगोपाल यांना दिलेले पत्रही घागरे याने ट्विट केले आहे.

काय म्हटलंय पत्रात ?

पत्रामध्ये सतेज पाटील यांनी जिंकलेल्या निवडणुकांची माहितीही देण्यात आली आहे. माजी मंत्री पाटील हे उत्कृष्ट संघटक आणि नेते असल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी घागरे याने केली आहे. त्यामुळे या बातमीची चर्चा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात सुरु आहे.

satej patil latest political news
कोळसा घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, 25 कोटींची संपत्ती जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.