Whatsapp ला I'm Sorry असा स्टेटस् ठेऊन दाम्पत्यानं केली गळफास घेऊन आत्महत्या; आठ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

‘लव्ह यू सो मच मम्मी अँड पप्पा, आय एम सो सॉरी’ असा मेसेज टाकून आई-वडिलांची मागितली माफी
Kolhapur Crime News
Kolhapur Crime Newsesakal
Updated on
Summary

राहुल परीट हा मनमिळावू स्वभावाचा होता. सात-आठ महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता.

गारगोटी : व्हनगुत्ती (ता. भुदरगड) येथील पती-पत्नीने दोन व्यक्तींकडून आर्थिक फसवणूक (Financial Fraud) झाल्यावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल राजाराम परीट (वय २३) व त्यांची पत्नी अनुष्का (२१) अशी त्यांची नावे आहेत. इस्पूर्ली (ता. करवीर) येथे गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी इस्पूर्ली पोलिस ठाण्यात (Ispurli Police Station) गुन्हा नोंद झाला. इस्पूर्लीत एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच नातेवाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक फौजदार नलवडे यांनी पंचनामा केला. चुलते दत्तात्रय परीट यांनी याबाबतची वर्दी दिली.

Kolhapur Crime News
दापोली, राजापूरसह 'या' मतदारसंघावर काँग्रेसचा दावा; बड्या नेत्याच्या घोषणेनं 'मविआ'चा फॉर्म्युला बिघडणार?

सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : आत्महत्या करण्यापूर्वी राहुल याने मित्र मंडळींच्या व्हॉटस् ॲपवर एक मोठा संदेश पाठविला. त्यात म्हटले आहे की, राहुल राजाराम पाटील महावितरणमध्ये काम करीत होता. त्यांची नियुक्ती कागल तालुक्यातील एका गावात होती.

Kolhapur Crime News
Koyna Dam Update : कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; महाबळेश्वरला 158 मिलिमीटर पावसाची नोंद

त्याने तेथील १०९ ग्राहकांची वीज बिल भरणा रक्कम सुमारे एक लाख ४५ हजार ७६० जमा केली होती. ही रक्कम भरण्यासाठी एका सहकाऱ्याकडे दिली होती. त्याने ती रक्कम न भरता वडिलांच्या उपचारासाठी वापरली. दरम्यान, त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याने याबाबत कोणालाही माहिती देऊ नको, मी तुला पैसे परत करतो, असे सांगितले होते.

सतत पैसे मागितल्यानंतर यातील फक्त तीस हजार रुपये इतकीच रक्कम परत केली. कागल तालुक्यातील दुसऱ्या एका व्यक्तीने कर्ज मिळवून देतो म्हणून माझ्याकडून एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम घेतली. यानंतर कर्ज प्रकरणाबाबत त्याच्याकडे सतत पाठपुरावा केला असता त्याने टाळाटाळ करून फसवणूक केली.

Kolhapur Crime News
Almatti Dam : महाराष्ट्र शासनाचं लक्ष असलेल्या 'आलमट्टी'तून दीड लाखांवर विसर्ग; कोल्हापूर, सांगलीला महापुराचा धोका?

त्याने मला कर्ज मिळवून दिले नाही. यानंतर दिलेली रक्कम परत मागितली असता केवळ दोन टप्प्यात दहा हजार रुपये ऑनलाईन दिले. मात्र, उर्वरित रक्कम दिली नाही. या दोन व्यक्तींच्या वागण्याला कंटाळून हा निर्णय घेतला. कारण वीज बिलाची रक्कम स्वतः भरण्याइतकी माझी परिस्थिती नाही. माझी पोलिसांना विनंती आहे की, या दोघांकडील माझी रक्कम आई-वडिलांना मिळवून द्यावी.

गावावर शोककळा

राहुल परीट हा मनमिळावू स्वभावाचा होता. सात-आठ महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपली फसवणूक झाल्याची चिठ्ठी कुटुंबीय व इतरांना पाठविली होती, असे सांगण्यात आले. त्याच्या या निर्णयाचा कुटुंबीयांसह, मित्र, ग्रामस्थांना धक्का बसला.

Kolhapur Crime News
Kolhapur : पावसाने भिंत कोसळून राहत्या घरात महिलेचा मृत्यू; मतिमंद रोशन झाला अनाथ, घटनेमुळं पंचक्रोशीत हळहळ

स्टेटसद्वारे मागितली माफी

राहुल परीट याने सोशल मीडिया स्टेटसवर वडिलांपेक्षा महत्त्वाचं कोणी नाही आणि आईपेक्षा मोठ कोणी नाही. ‘लव्ह यू सो मच मम्मी अँड पप्पा. आय एम सो सॉरी’ असा मेसेज टाकून आई-वडिलांची माफी मागितली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()