पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळून केला खून; दोन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह, गुन्हा लपविण्यासाठी जयदीपनं इंद्रायणी नदीत..

कुरुंदवाड येथील नवविवाहित मुलीचा पुणे जिल्ह्यातील देहूगाव येथे पतीने ओढणीने गळा आवळून खून केला.
Murder Case
Murder Caseesakal
Updated on
Summary

दोन महिन्यांपूर्वीच विवाह प्रतीक्षाचा खून झाल्याची माहिती पोलिसांनी कुरुंदवाड येथील माहेरच्या नातेवाईकांना दिली.

कुरुंदवाड : येथील नवविवाहित मुलीचा पुणे जिल्ह्यातील देहूगाव येथे पतीने ओढणीने गळा आवळून खून (Murder Case) केल्याची घटना उघडकीस आली. सौ. प्रतीक्षा जयदीप यादव (वय २१, रा. ओमसाई सोसायटी, देहू-आळंदी रोड, देहूगाव) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पती जयदीप अर्जुन यादव (वय, ३०) याला देहूरोड पोलिसांनी अटक केली.

त्याला न्यायालयात (Court) उभे केले असता २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी (Dehu Road Police Station) सुनावली आहे. येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे याची प्रतीक्षा ही मुलगी होती. कोरे यांनी कष्ट करून मुलीला एम.एस.सी.पर्यंत शिक्षण दिले होते. दोनच महिन्यांपूर्वी (चिखलगोळ, ता. विटा, जि. सांगली) येथील डिप्लोमा इंजिनिअरपर्यंत शिकलेल्या जयदीप यादवशी तिचे लग्न झाले होते.

Murder Case
गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! मदरशात फॉर्म भरण्याच्या बहाण्याने सातवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; मौलानाला 10 वर्षांचा कारावास

जयदीप हा पुणे येथे नोकरीला होता. तो आठच दिवसांपूर्वी पत्नी प्रतीक्षाला पुण्यात घेऊन गेला होता. गुरुवारी रात्री जयदीप हा प्रतीक्षाला ते राहत असलेल्या देहगाव येथील गाथा मंदिरामागील इंद्रायणी नदीच्या घाटावर फिरायला म्हणून घेऊन गेला. तेथे ओढणीने प्रतीक्षाचा गळा आवळून त्याने खून केल्याची घटना घडली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अंमलदार किरण राजाभाऊ पाटील यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पती जयदीप यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर त्यास अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवस पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले. पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे तपास करत आहेत.

Murder Case
मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करत असाल, तर ही बातमी महत्त्वाची! 'या' घाटातील संरक्षण भिंत कोसळली

दोन महिन्यांपूर्वीच विवाह

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच विवाह प्रतीक्षाचा खून झाल्याची माहिती पोलिसांनी कुरुंदवाड येथील माहेरच्या नातेवाईकांना दिली. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह आई-वडिलांच्या ताब्यात दिला. येथे कृष्णा घाटावर मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले.

मोबाईल टाकले इंद्रायणी नदीत

जयदीपने गुन्हा लपविण्यासाठी प्रतीक्षा व स्वतःचा मोबाईल इंद्रायणी नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.