Hasan Mushrif : 'माझ्यासमोर कुणीही उभं राहू दे, कागलचा आमदार मीच होणार'; हसन मुश्रीफांचं कोणाला चॅलेंज?

Hasan Mushrif : ‘घाटगे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत आणि त्यांनी मला उघड पाठिंबा देण्याचे धाडस दाखवले. त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.'
Hasan Mushrif Samarjeetsingh Ghatge
Hasan Mushrif Samarjeetsingh Ghatgeesakal
Updated on
Summary

निवडणुकांच्या तोंडावर समाजांमध्ये तेढ वाढवणे योग्य नाही. ज्या पद्धतीने वक्तव्य होत आहेत हे अत्यंत खेदजनक असल्याचे मत मुश्रीफ यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्याविषयी बोलताना व्यक्त केले.

कोल्हापूर : कागलची निवडणूक तिरंगी, चौरंगी कशीही होऊ दे मीच आमदार होणार आणि मंत्रिमंडळातही असणार, असा ठाम विश्‍वास पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. माजी आमदार संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांच्या पाठिंब्यामुळे मला हत्तीचे बळ मिळाल्याचेही ते म्हणाले.

(ता. ४) कागल येथे झालेल्या मेळाव्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार माजी आमदार संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा दिला. याबाबत मुश्रीफ यांची भेट घेतली असता ते बोलत होते. ते म्हणाले, ‘कोण जिंकणार, हे जनता ठरवेल. २५ वर्षांच्या पुढील प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. अजित पवार गट आणि घड्याळ चिन्हावर माझा प्रचार सुरू झालेला आहे. माझ्यासमोर कोण उभे राहणार, याची मी चिंता करत नाही. लढत कशीही होऊ दे मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात असणार आहे.’

संजय घाटगे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘घाटगे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत आणि त्यांनी मला उघड पाठिंबा देण्याचे धाडस दाखवले. त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. त्यांच्या पाठिंब्‍यामुळे मला विधानसभा निवडणुकीत बळकटी मिळेल आणि हत्तीचे बळ प्राप्त होईल.’

निवडणुकांच्या तोंडावर समाजांमध्ये तेढ वाढवणे योग्य नाही. ज्या पद्धतीने वक्तव्य होत आहेत हे अत्यंत खेदजनक असल्याचे मत मुश्रीफ यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्याविषयी बोलताना व्यक्त केले. यावेळेला बहुरंगी लढती होतील. आता कोणी थांबायला तयार नाही. आठ दहा पक्ष झाले आहेत. तिसरी, चौथी आघाडी तयार होईल. आमदार बच्चू कडू यांनी काही दिवसांपासून वेगळी भूमिका घेतली आहे. ते तिसरी आघाडी करू शकतात, असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

आमदार आबू आझमी यांनी पुन्हा विशाळगडावर जाण्याची गरज नाही, पालकमंत्री म्हणून त्यांना मी विनंती करेन. माझ्यासह उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्ष तेथे जाऊन आले आहेत. आता वातावरण शांत झाले आहे. त्यांनी विशाळगडावर जाऊन शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, असेही ते म्हणाले. आमदार अनिल देशमुख यांना हे सर्व काढायचे होते तर यापूर्वीच काढायला हवं होतं. इतके दिवस थांबण्याची गरज नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचे काम श्री. देशमुख करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.