Shiv Sena : अमित शहांनी शब्द दिलाय, त्यामुळं मी शिवसेनेतूनच लोकसभा लढवणार; 'या' खासदारानं स्पष्ट केली भूमिका

लोकसभा निवडणुकीत मी भाजपचा उमेदवार असणार ही दिशाभूल करणारी बातमी आहे.
Amit Shah
Amit Shahesakal
Updated on
Summary

पुढील काळातही बारातमीचे ज्योतिषी येतील, पण आम्ही राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे वारस आहोत. अशा चर्चांना थारा देणार नाही.

कोल्हापूर : ‘राज्यात भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना जोमाने एकत्रित काम करत आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी विद्यमान खासदारांनाच उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे.

त्यामुळे मी आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) शिवसेनेतूनच लढवणार’, असे खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे आपले जुने मित्र आहेत, गेल्या निवडणुकीत ते माझ्या विरोधात असले तरी, त्यावेळचे राजकारण वेगळे होते.

त्यावेळी भाजप-सेनेचा मी उमेदवार होता. आताही तसेच होणार असून महाडिक यांच्यासह भाजपचे लोक माझा प्रचार करतील, असा दावाही मंडलिक यांनी यावेळी केला. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांच्या पातळीवर या निवडणुकीची तयारी सुरू असताना भाजप-शिंदे गटाच्या हालचालींविषयी उत्सुकता आहे. या पार्श्‍वभूमीवर मंडलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

Amit Shah
Sangli : एका बाजूला सत्तेची मस्ती असणारे लोक तर दुसऱ्या बाजूला..; NCP आमदाराची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका

ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत मी भाजपचा उमेदवार असणार ही दिशाभूल करणारी बातमी आहे. या पारावरच्या अर्थहीन गप्पा आहेत. बारामतीचे काही ज्योतिषी कोल्हापुरात आलेत का? त्यांच्याकडून अशा वावड्या उठवल्या जातात का? हे बघावे लागेल. कारण, अशा चर्चा करण्यात काही अर्थ नाही.

Amit Shah
Satara : शिवस्मारकाला धक्का न लावता पोवई नाक्यावर बाळासाहेबांचं स्‍मारक होणारच; वादावर देसाईंची स्पष्ट भूमिका

मी कोणत्याही माध्यमांशी किंवा खासगी स्वरूपातही अशी कधी चर्चा केलेली नाही. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांचा मला फोन नाही. २०१९ च्या निवडणुकीत ‘आमचं ठरलंय’ म्हणून काही लोकांनी मदत केली, त्याची परतफेड मी केली आहे. आता २०२४ च्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे.

Amit Shah
Siddheshwar Factory : कामगारांची पोटं भरणारी 'चिमणी' पुन्हा उभी राहणार; भारतीय महासंघ करणार मदत

२०१९ पासून राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. जागांची अदलाबदल ही निवडणुकीच्या काळात होते, त्यावर आता चर्चा करणे योग्य नाही. जर-तर याला राजकारणात काही अर्थ नसतो. त्यावेळी आणि पुढील काळातही बारातमीचे ज्योतिषी येतील, पण आम्ही राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे वारस आहोत. अशा चर्चांना थारा देणार नाही, असेही प्रा. मंडलिक यांनी सांगितले.

Amit Shah
Satara : उदयनराजेंशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण ते त्यांच्याच विश्वात असतात; शिवेंद्रराजेंनी उडवली खिल्ली

सर्व्हे कुणाचा महत्त्वाचा

‘भाजपच्या कोणत्या विद्वानांनी अलिकडचा सर्व्हे केला मला माहिती नाही. पण अलिकडेच एक सर्व्हे आला, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किती कौल दिला हे माहिती आहे. त्यामुळे सर्व्हे कुणाचा महत्त्वाचा हे यावरून स्पष्ट होते’, असा टोलाही प्रा. मंडलिक यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.