Ichalkaranji Politics : महायुतीच्या उमेदवारीचा वाढणार गुंता; हाळवणकरांच्या भूमिकेकडे लक्ष, कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?

Ichalkaranji Assembly Constituency Politics : विशेषतः महायुतीकडून प्रबळ दावेदार असलेल्या सुरेश हाळवणकर (Suresh Halvankar) यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
Ichalkaranji Assembly Constituency Politics
Ichalkaranji Assembly Constituency Politicsesakal
Updated on
Summary

आमदार आवाडे हे विधानसभेत भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची सतत चर्चा होत राहिली आहे.

इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून (Ichalkaranji Assembly Constituency) आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) यांच्याऐवजी आता राहुल आवाडे (Rahul Awade) उमेदवार असणार आहेत. त्यांनी ताराराणी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, त्यांच्या उमेदवारीवर महायुतीकडून (Mahayuti) शिक्कामोर्तब होणार काय, याकडेही लक्ष आहे. आवाडे यांच्या या निर्णयामुळे महायुतीकडून उमेदवारी निश्चित करताना आता गुंता वाढणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.