भाजप नेते सुरेश हाळवणकर बंडखोरी करणार? आमदार आवाडेंच्या BJP प्रवेशानंतर स्वत:च स्पष्ट केली भूमिका

BJP leader Suresh Halvankar : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्याचे धोरण आहे.
BJP leader Suresh Halvankar
BJP leader Suresh Halvankaresakal
Updated on
Summary

प्रकाश आवाडे यांनी राहुल यांची भाजपतर्फे उमेदवारी जाहीर केली आहे. त्याला हाळवणकर यांनी आक्षेप घेतला आहे.

इचलकरंजी : आमचा आणि आवाडे यांचा खूप वर्षांचा संघर्ष आहे. पण, पक्ष बळकटीसाठी नेतृत्वाने निर्णय घेतल्यामुळे आवाडे (Prakash Awade) यांच्या पक्षप्रवेशासाठी मी व्यक्तिगत मान्यता दिली आहे. आपण याबाबत नाराज नाही. नाराजीतून पक्ष सोडणार नाही. बंडखोरी करणार नाही, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर (Suresh Halvankar) यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या घडामोडीवर पक्ष कार्यकर्त्यांची सकारात्मक मानसिकता नाही. पितृ पंधरवडा झाल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

BJP leader Suresh Halvankar
Amit Shah : 'शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा'; विधानसभेआधी अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन

हाळवणकर म्हणाले, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी आवाडे यांच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याशी चर्चा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्याचे धोरण आहे. त्यामुळे पक्षाच्या निर्णयाला आपण मान्यता दिली आहे. पक्षप्रवेश देतांना वरिष्ठांकडून कोणताही शब्द घेतलेला नाही. आपण यापुढेही पक्षातच पूर्वीप्रमाणे काम करीत राहणार आहे. आपण प्रदेश भाजपचे पदाधिकारी असल्यामुळे पक्षात आपल्या नेतृत्वाखाली आवाडे कार्यरत राहतील. यापुढेही पक्ष बांधणीचे काम गतीने सुरू राहील. आमदार शशिकला जोल्ले यांच्या सुरू असलेल्या सभांबाबत या घडामोडींचा कोणताही परिणाम होणार नाही.

BJP leader Suresh Halvankar
पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली! 'या' पिता-पुत्राचा BJP मध्ये जाहीर प्रवेश; हाळवणकरांची भूमिका ठरणार महत्त्वाची

चार जागांची मागणी, उमेदवारी घोषणेवर आक्षेप

जिल्ह्यात इचलकरंजी, हातकणंगले, कोल्हापूर दक्षिण व उत्तर अशा चार जागांची मागणी केली आहे, असे हाळवणकर यांनी यावेळी सांगितले. प्रकाश आवाडे यांनी राहुल यांची भाजपतर्फे उमेदवारी जाहीर केली आहे. त्याला हाळवणकर यांनी आक्षेप घेतला आहे. भाजपमध्ये उमेदवारीची मागणी केली जात नाही. उमेदवारीबाबत पक्षाच्या समितीमध्ये निर्णय होतो. त्यानंतर ती उमेदवारी मान्य केली जाते. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा असेल, असे हाळवणकर यांनी स्पष्ट केले.

कार्यालय बंद, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

भाजपचे कार्यालय आज सकाळी बंद होते. तर आवाडे यांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क करीत थेट हाळवणकर यांचे संपर्क कार्यालय गाठले. त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आले. त्यांच्यामधील अस्वस्थता व नाराजी स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसून येत होती. त्यामुळे पुढील काळात त्याचे पडसाद उमटणार काय, याकडे आता राजकीय क्षेत्राचे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.