पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली! 'या' पिता-पुत्राचा BJP मध्ये जाहीर प्रवेश; हाळवणकरांची भूमिका ठरणार महत्त्वाची

MLA Prakash Awade Rahul Awade join BJP : आवाडे पिता-पुत्रांच्या या राजकीय घडामोडीमुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील (Ichalkaranji Assembly Constituency) राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.
MLA Prakash Awade Rahul Awade join BJP
MLA Prakash Awade Rahul Awade join BJPesakal
Updated on
Summary

आवाडे यांच्या भाजप प्रवेशामुळे या जागेवर भाजपकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी निश्‍चित समजली जात आहे.

कोल्हापूर : पाच वर्षांपूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष विजयी झालेले आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) यांनी बुधवारी पुत्र माजी जिल्हा परिषद राहुल यांच्यासह भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे आवाडे यांचे राजकीय विरोधक माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनीच या दोघांना प्रवेशासाठी स्टेजवर आणले.

MLA Prakash Awade Rahul Awade join BJP
राष्ट्रवादीचं टेन्शन वाढवणारी बातमी; माढ्यातून परिचारक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? राजकीय घडामोडींना वेग

दरम्यान, आवाडे पिता-पुत्रांच्या या राजकीय घडामोडीमुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील (Ichalkaranji Assembly Constituency) राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. आवाडे यांनी यापूर्वीच आपल्याऐवजी आपले पुत्र राहुल हे विधानसभा लढवतील असे जाहीर केले आहे. त्यामुळे हाळवणकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत आवाडे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपचे तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांच्याविरोधात अपक्ष म्हणून विधानसभा लढवली व जिंकली. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. तेव्हापासून ते केव्हाही भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. गेले वर्षभर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातही याची चर्चा होती, या चर्चेला त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पूर्णविराम मिळाला.

MLA Prakash Awade Rahul Awade join BJP
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात उमदेवारीसाठी चुरस; 'महायुती'कडून कोणाला मिळणार संधी? बंडखोरीचीही शक्यता

आवाडे यांच्या भाजप प्रवेशामुळे या जागेवर भाजपकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी निश्‍चित समजली जात आहे. सहकारी संस्थांचे मोठे जाळे, या संस्थांचा चांगला कारभार आणि गेली अनेक वर्षे खासदारकी, आमदारकी घरात असल्याने एक प्रबळ उमेदवार आवाडे यांच्या रूपाने भाजपला मिळाला आहे. मात्र, त्याचवेळी या मतदारसंघातून गेल्या पाच वर्षांपासून तयारी करत असलेल्या हाळवणकर यांचे विधानसभेपूर्वी की नंतर पुनर्वसन केले जाणार यावर या मतदारसंघातील राजकीय चित्र अवलंबून आहे.

MLA Prakash Awade Rahul Awade join BJP
Amit Shah : 'शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा'; विधानसभेआधी अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन

पश्‍चिम विभागीय कार्यकर्ता मेळाव्यासाठी केंद्रीय गृहमंत्री शहा आज कोल्हापुरात आले होते. त्यांच्या उपस्थितीत महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात आवाडे यांचा पक्षप्रवेश झाला. केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी आवाडे यांच्यासह त्यांचे पुत्र राहुल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री सुरेश खाडे, चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आदी उपस्थित होते.

'सकाळ'चे वृत्त खरे

आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह त्यांचे पुत्र राहुल आवाडे बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त ‘सकाळ’च्या बुधवारच्या (ता. २५) अंकात प्रसिद्ध झाले होते. आवाडे यांच्या पक्ष प्रवेशाने हे वृत्त खरे ठरले. याची चर्चा इचलकरंजीसह जिल्ह्यात होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.