Ichalkaranji Crime : दुसऱ्या पुरुषाशी बोलली म्हणून प्रियकरानं कापला प्रेयसीचा चाकूनं गळा; दोघांमध्ये जोरदार भांडण

काही दिवसांपासून या दोघांमध्ये काही ना काही कारणातून खटके उडत होते.
Crime News
Crime Newsesakal
Updated on
Summary

हातात चाकू घेवून त्यांना फरशीवर खाली पाडले. तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत त्यांचा चाकूने गळा कापला.

इचलकरंजी : अन्य पुरुषाशी बोलल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीचा चाकूने गळा कापला. या खुनी हल्ल्यात छाया संतोष शिवशरण (वय ३७) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. किशोर लक्ष्मण सोळंकी ( वय ३८, रा.जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. ही घटना जवाहरनगर भागातील जवाहरनगर हायस्कूलच्या पाठीमागे घडली.

Crime News
Kolhapur : कोल्हापुरात समोर आला धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा गर्भपात? खासगी रुग्णालयातील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, छाया शिवशरण व संशयित किशोर सोळंकी यांचे प्रेमसंबंध आहेत. या प्रेमसंबंधातून दोघे जवाहरनगर हायस्कूलच्या पाठीमागे अनेक दिवसांपासून एकत्र राहतात. काही दिवसांपासून या दोघांमध्ये काही ना काही कारणातून खटके उडत होते.

छाया शिवशरण या रोहित माने यांच्याशी बोलत असल्यामुळे सोळंकी याला राग होता. याच रागातून सोमवारी (ता.२१) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये भांडणे झाली. सोळंकी याने प्रेयसी छाया यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. संतापाच्या भरात सोळंकी याने त्यांना मारहाण करत किचनमध्ये नेले.

Crime News
धक्कादायक! दारू पिऊन अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक अत्याचार; काही महिन्यांपूर्वीच तिच्या आई-वडिलांचं झालं होतं निधन

हातात चाकू घेवून त्यांना फरशीवर खाली पाडले. तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत त्यांचा चाकूने गळा कापला. या खुनी हल्ल्यात छाया शिवशरण गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी आयजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला करणाऱ्या किशोर सोळंकी याला शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police) अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.