संभाव्य महापूर नियंत्रणासाठी इचलकरंजी पालिका सज्ज; 5 हजार कुटूंबांची व्यवस्था

स्थलांतराचा प्रश्‍न निर्माण झाल्यास 122 छावणीच्या ठिकाणी 5000 कुटुंबांची व्यवस्था
संभाव्य महापूर नियंत्रणासाठी इचलकरंजी पालिका सज्ज; 5 हजार कुटूंबांची व्यवस्था
Updated on

इचलकरंजी : यावर्षीची संभाव्य पूरस्थीती लक्षात घेवून आतापासूनच पालिकेकडून (ichalakaranji corporation) यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले असून त्याबाबतची माहिती आज पालिका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे (district authority) सादर करण्यात आली. यंदाही कोरोना संसर्गाचे (covid-19) संकट संपलेले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या संभाव्य महापूराच्या काळात स्थलांतराचा प्रश्‍न निर्माण झाल्यास 122 छावणीच्या ठिकाणी तब्बल 5 हजार कुटुंबांची व्यवस्था करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (ichalkaranji corporation 5000 people alert flood situation migration problem solve)

दरवर्षीप्रमाणे पावसाळा आला (rain season) की संभाव्य वित्त व जिवित हानी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते. महापूरासारख्या (flood sistuation) आपत्तीच्या काळात पालिका प्रशासनाची मोठी कसरत असते. अशावेळी पूर्व नियोजन असल्यास महापूराच्या काळात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती हातळणे सोपे जाते. अन्यथा, त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यासाठी आतापासून पालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचा आज जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेण्यात आला.

संभाव्य महापूर नियंत्रणासाठी इचलकरंजी पालिका सज्ज; 5 हजार कुटूंबांची व्यवस्था
कोल्हापुरात कडक कारवाई : विमानतळ रोडवर 25 जणांना दंड

अलीकडच्या काळात सन 2005 मध्ये महापूर आला होता. त्यावेळी पंचगंगा नदीची (panchaganga river) पाण्याची पातळी 76 फुटावर गेली होती. या काळात 18 छावण्यामध्ये 1900 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यापेक्षा 2019 मध्ये आलेल्या महापूराची परिस्थिती महाभयंकर होती. तब्बल 80 फुटांवर पाण्याची पातळी आली होती. तर 56 छावण्यामध्ये 4878 कुटुंबांची आसरा घेतला होता. पंचगंगा नदीची येथील 68 फुट इशारा तर 71 फुट धोका पातळी आहे. यापूर्वी बाधीत झालेल्या क्षेत्रातील लोकसंख्या (population) 18 हजार 850 इतकी आहे.

शहरातील पूरबाधीत क्षेत्र असे

लक्ष्मी दड्ड वसाहत, नदीवेस, कटके गल्ली, टाकवडे वेस, आंबी गल्ली, बौध्द विहार परिसर, मुजावर पट्टी, आवाडे सबस्टेशन, पी.बा. पाटील मळा, तणंगे मळा, ढोले पाणंद, श्रीपादनगर, ढोरवेस, गुजरी पेठ, टिळक रोड, सारवान बोळ, बागडी गल्ली, चांदणी चौक, जूना वैरण बाजार, विकली मार्केट, त्रिशुल चौक, पिराचा मळा, कलावंत गल्ली, तोडकर गल्ली, जूना चंदूर रोड परिसर आदी.

पालिकेची संभाव्य तयारी

  • 24 तास आपत्कालीन नियंत्रण कक्ष

  • 122 ठिकाणी पूर्नवसन छावण्या

  • छावण्यांमध्ये 5 हजार कुटुंबांची व्यवस्था

  • आवश्यक कर्मचारी वर्गाची नियुक्ती

  • धोकादायक इमारतींची कार्यवाही सुरु

  • साथीच्या रोगावर नियंत्रणासाठी यंत्रणा

  • महत्वाचे मोबाईल क्रमांक असलेली पुस्तिका

  • सर्पमित्र, जलतरणपट्टू, स्वयंसेवी संस्थांची यादी

उपलब्ध साधने

  • यांत्रीक बोट -1

  • साधी बोट -1

  • लाईफ जॅकेट - 25

  • लाईफ रिंग्ज - 6

  • दोर - 500 फुट

  • मेगा फोन - 3 नग

  • गळ - 3 नग

  • इनर - 2 सेट

  • इमर्जन्सी लॅम्प - 2 नग

  • स्लायडींग शिडी - 3 नग

  • रिफ्लेक्टीव्ह जॅकेट्स - 8 नग

  • मोठे टॉर्च - 2 नग

  • दुर्बिण - 3 नग

  • र्आदी साहित्य

संभाव्य महापूर नियंत्रणासाठी इचलकरंजी पालिका सज्ज; 5 हजार कुटूंबांची व्यवस्था
टूलकिट प्रकरण : दिल्ली उच्च न्यायालय केंद्र सरकारवर नाराज

उपलब्ध वाहने

  • फायर फायटर - 3

  • फायर बुलेट - 2

  • रुग्णवाहिक- 2

  • हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म - 1

  • टिप्पर - 1

  • मैला टँकर - 1

  • रिफ्युज कॉम्पॅक्टर - 2

  • औषध फवारणी ट्रॅक्टर -4

  • सक्शन टँकर -1

  • शववाहिका -2

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.