इचलकरंजी : सुधारीत भाडेदरानुसार पालिकेच्या १३ दुकान गाळ्यांची ई-लिलाव प्रक्रीया आज यशस्वी झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार अनामत रकमेवर जादा बोलीवर ही प्रक्रीया राबविण्यात आली. यामध्ये एकाचा अपवाद वगळता विद्यमान गाळेधारकांनीच ई- लिलाव जिंकला. यातून पालिकेकडे ६५ लाख ७२ हजार इतकी रक्कम मिळणार आहे. सर्वाधिक १८ लाख ५० हजार इतकी अनामत जून्या पालिका इमारतीतील पाच क्रमांकाच्या गाळ्याला मिळाली.
त्रीसदस्यीय समितीने सुधारीत भाडे व अनामत वाढ सुचवली होती. त्यानुसार मुदत संपलेल्या दुकान गाळ्यांसाठी पालिकेने ई - लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. पण त्याला १३ गाळेधारकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयांने दुकानगाळे विद्यमान गाळेधारकांच्या ताब्यात ठेवून ई - लिलाव प्रक्रीया राबविण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार पालिकेच्या मिळकत विभाकडून याबाबतची प्रक्रीया राबविण्यात आली. त्याची मुदत आज पाच वाजेपर्यंत होती.
सुधारीत भाडे व अनामत रकमेवर प्रथमच ई - लिलाव प्रक्रीया राबविण्यात आली होती. त्यामुळे ही प्रक्रीया यशस्वी होणार काय, याकडे लक्ष लागल होते. त्यानुसार आज मुदतीनंतर मिळकत विभागांने ई - लिलाव प्रक्रीयेची छाननी केली. त्यामध्ये सर्व १३ गाळ्यांसाठी ई- लिलावात बोलीधारक सहभागी झाल्याचे दिसून आले. जुन्या पालिका इमारतीमधील १० व शाॅपींग सेंटरमधील ३ दुकान गाळे ई- लिलाव प्रक्रीयेत समाविष्ट करण्यात आले होते.
यामध्ये जून्या पालिका इमारतीतील पाच क्रमांकाच्या दुकान गाळ्याला तब्बल १८ लाख ५० हजार इतकी अनामत रकमेवर बोली आली. तर याच इमारतीतील १६ नंबरच्या गाळ्याला १५ लाख २० हजार इतकी अंतीम बोली आली. तर शापींग सेंटरमधील तीन गाळ्यांना एकूण १३ लाख ५० हजारांची बोली आली. तर अन्य कांही गाळ्यांना मात्र अपेक्षीत बोली आली नाही. ५ क्रमांकाचा गाळा यापूर्वी शेतकरी संघाकडे होता. मात्र त्यांनी ई- लिलाव प्रक्रीयेत भाग घेतला नसल्याचे सांगण्यात आला.
८० दुकानगाळे रिकामेच
पालिकेच्या मिळकत विभागाकडून एकूण ९३ दुकान गाळ्यांसाठी ई- लिलाव प्रक्रीया राबवली. यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून रिकामे पडलेल्या ८० दुकान गाळ्यांचाही यामध्ये समावेश होता. मात्र या ई - लिलाव प्रक्रीयेत या दुकान गाळ्यांसाठी कोणीही बोलीधारक पुढे आला नाही. त्यामुळे ८० दुकान गाळे हे रिकामेच पडले आहेत.
ई- लिलाव प्रक्रिया दृष्टीक्षेप m(अनामत रकमेवर बोली)
लिलावधारक - इमारत नाव - गाळा क्रमांक - अंतीम बोली
अभिजीत पोवार - जुनी पालिका - १ - २,६९०००
सविता कबाडी - जुनी पालिका - ५ - १८,५०००
इम्रान मकानदार - जुनी पालिका - ६ - २,८३०००
अर्चन करंदीकर - जुनी पालिका - ७ - २,८१०००
आयुष्य मुलचंदाणी - जुनी पालिका - ८ - १,६००००
आयुष्य मुलचंदाणी - जुनी पालिका - ९ - १,६००००
सुरज जेसवाणी - जुनी पालिका - १२ - २,७७०००
मुन्वर शेख - जुनी पालिका - १६ - १५,२००००
अभीजीत पोवार - जुनी पालिका - २३ - १,५६०००
अभीजीत पोवार - जुनी पालिका - २४ - २,६३०००
निलेश गाला - शाॅपींग सेंटर - १ - ४,४६०००
महेश जेसवाणी - शाॅपींग सेंटर - ११ - ४,५२०००
शशिकांत दायम - शाॅपींग सेंटर - १४ - ४,५५०००
एकूण - ६५,७२०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.