इचलकरंजी : मुलीने जन्मदात्या बापाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. संबंधित तरुणीने डोक्यात बॅट आणि कटावणीसारख्या शस्त्राने वर्मी घाव घातला. (Crime) यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर खुनाची कबुली देत घरातून मोठी मुलगी आईसह थेट शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाली. (Ichalkaranji crime news) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. कौटुंबिक वादातून खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली. (Police action)
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत व्यक्ती शेती करतो. त्यांना तीन मुली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मोठ्या मुलीसाठी घरालगत छोटे दुकान सुरू करून दिले. तिच्यासाठी स्थळ पाहणीही सुरू होती. अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये सतत वाद व्हायचा. मंगळवारी पुन्हा सायंकाळी त्यांच्या घरात अचानकपणे वाद सुरू झाला. वादातूनच तिने वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. डोक्यात कटावणी व बॅटने मारहाण करून गंभीर जखमी केले. ते जागीच कोसळले. घरातील भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाले. नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमले.
नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आयजीएम रुग्णालयात दाखल केले. याची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांचे पथक हजर झाले. अप्पर पोलिस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड, पोलिस उप अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी आयजीएम रुग्णालयासह घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, खुनाची कबुली देत संबंधित तरुणी आईसह शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाली. याबाबत नातेवाईकांशी चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कौटुंबिक वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
खुनानंतर मुलीसह आई गायब
वडिलांचा खून केला आणि त्यानंतर तिने आईसह कोणालाही न सांगता घर सोडले. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने खून झाल्याचे त्यांच्या वृद्ध आईच्या निदर्शनास आले. त्यानंतर या दोघींचा नातेवाईकांनी शोध घेतला असता त्या पोलिस ठाण्यात असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी सर्व बाजूंनी तपासला गती दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.