Ichalkaranji News : आम्ही तुम्हाला आमच्या पक्षात घेतले, पुढे आम्हाला तुम्ही पक्षातून काढू नका - माजी आमदार सुरेश हाळवणकर

इचलकरंजीतील एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले आमदार आवाडे व माजी आमदार हाळवणकर आदा एकाच पक्षात म्हणजे भाजपमध्ये आहेत.
mla suresh halvankar
mla suresh halvankarsakal
Updated on

इचलकरंजी - आम्ही तुम्हाला आमच्या पक्षात घेतले आहे. पण पुढे आम्हाला तुम्ही पक्षातून काढू नका, असा चिमटा माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी काढल्यानंतर आक्रमक शैलीत आमदार प्रकाश आवाडे यांनी उत्तर दिले. मी भाजपला पाठिंबा देवून पाच वर्षे झाले, पण मी अद्याप तुमच्या कार्यालयात आलो नाही. आता तुम्ही सन्मानांने बोलविल्यावरच येणार आहे, असे सांगत त्यांनी एकप्रकारे हाळवणकर यांना आव्हानच दिले.

इचलकरंजीतील एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले आमदार आवाडे व माजी आमदार हाळवणकर आदा एकाच पक्षात म्हणजे भाजपमध्ये आहेत. आमदार आवाडे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण अद्याप या आजी-माजी आमदारांध्ये फारसे सूर जुळले नसल्याचे चित्र आज पून्हा दिसले.

बिल्डर्स असोसिएशनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप पक्षप्रवेशानंतर आमदार आवाडे व हाळवणकर एकत्र आले होते. यावेळी दोघांमध्ये जोरदार टोलेबाजी रंगली. यापूर्वीही अनेक कार्यक्रमांत एकमेकांवर टोलेबाजी करण्याची संधी दोन्ही नेत्यांनी सोडलेली नाही.

आवाडे यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर प्रथमच आज एकाच मंचावर आले. त्यावेळी दोघे काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. आवाडे व आम्ही आता भाजपमध्ये एकत्र आहोत. त्यांना आम्ही आमच्या पक्षात घेतले आहे. पण पुढे आम्हालाच पक्षातून काढू नका, अशा मोजक्याच शब्दात आवाडे यांच्याकडे पाहत हाळवणकर यांनी चिमटा काढला.

त्यानंतर आवाडे यांनी आपल्या भाषणात या संदर्भाने बरीच मांडणी करतांना आता आपले नेते एकच असून लक्ष्यही एकच असल्यांने हातात हात घालून भाजपच्या माध्यमातून शहराचा विकास करुया, असे नमूद केले.

राजकारणातील गमतीची धार कमी झाली

हाळवणकर यांनी माझा दोनवेळा पराभव केला. त्यांचा मी एकदा पराभव केला आहे. त्यानंतर त्यांच्याच पक्षाला पाठिंबा दिला. आता मी त्यांच्याच पक्षात गेलो आहे. त्यामुळे आमची भांडणे आता संपली आहेत. इर्षा बाजूला गेली आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आल्यामुळे आता राजकारणातील गमतीची धार कमी झाली आहे, असे आमदार आवाडे यांनी यावेळी नमूद केल्यानंतर कार्यक्रमस्थळी हास्य पसरले.

मुंबईत जातो, पण इथे आलो नाही

मी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर भाजपच्या मुंबई कार्यालयात कायम जातो. पण गेल्या पाच वर्षात इचलकरंजीतील भाजप कार्यालयात आजपर्यंत पाय ठेवलो नाही. आता सन्मानाने बोलविल्यावरच कार्यालयात येणार आहे, असे आव्हान देत आमदार आवाडे यांनी यापुढे आपणास हातात हात घालूनच काम करावे लागणार आहे, असे सांगत एकप्रकारे हाळवणकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

विधान परिषदेसाठी हाळवणकर यांची चर्चा

विधान सभेची संभाव्य उमेदवारी राहूल आवाडे यांचा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे जिल्ह्याताली जेष्ठ नेते माजी आमदार हाळवणकर यांचे काय, असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थीत करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हाळवणकर यांना विधान परिषदेवर नजिकच्या कालावधीत संधी दिली जाणार असल्याच्या चर्चेने आज शहरात दिवसभर जोर धरला होता. मात्र हाळवणकर यांनी याबाबतचा कोणताच अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.