गर्भलिंग निदान चाचणी; रुग्णालयावर कारवाई, इचलकरंजीतील प्रकार

रुग्णालयावर दुसऱ्यांदा गर्भलिंग चाचणी होत असल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
गर्भलिंग निदान चाचणी; रुग्णालयावर कारवाई, इचलकरंजीतील प्रकार
Updated on

इचलकरंजी : प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचणी केल्याबद्दल बुधवारी सकाळी विकली मार्केट शेजारील काटकर रुग्णालयावर कारवाई करण्यात आली. गावभाग पोलिसांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे हा गैरप्रकार उघडकीस आणला. (ichalkaranji crime news) या गर्भलिंग होत असल्याची तक्रारीवरून पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. हॉस्पिटलवर दुसऱ्यांदा गर्भलिंग चाचणी होत असल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. (ichalkaranji update)

गर्भलिंग निदान चाचणी; रुग्णालयावर कारवाई, इचलकरंजीतील प्रकार
'विठाई'त झाला 'माऊली'चा जन्म; आनंद अश्रूंनी आईचे डोळे पाणावले

काही दिवसांपूर्वी प्रसूतिपूर्व काटकर या खासगी रुग्णालयात बेकायदा गर्भलिंग निदान होत असल्याची तक्रार निर्भया पथकाकडे केली होती. याचा छडा लावण्यासाठी एका जोडप्याला रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या हॉस्पिटलवर दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. देशमुख यांसह आरोग्य विभागाचे पथक रुग्णालयात दाखल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.