एसटी संपावर निर्णय एेकताच इचलकरंजीत कर्मचाऱ्याचा मृत्यू

एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी हुंदका देत राज्य शासनाचा निषेध
Ichalkaranji
IchalkaranjiESakal
Updated on

इचलकरंजी : अडीच महिन्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers Strike) प्रश्नावर मुंबई (Mumbai) येथील बैठकीत तोडगा न निघाल्याने उपोषण स्थळीच एसटी कर्मचाऱ्याचा तीव्र हृदयविकाऱ्याच्या झटक्याने मृत्यू झाला. शरणाप्पा गिरमलप्पा मुंजाळे (वय 31 रा.मूळ रा.अक्कलकोट )असे त्यांचे नाव आहे. घटनेनंतर आयजीएम रुग्णालयात (IGM Hospital)उपचारासाठी दाखल केले .मात्र उपचापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.राज्यातील हा 72 वा बळी आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी हुंदका देत राज्य शासनाचा निषेध केला.

Ichalkaranji
एसटी कर्मचाऱ्यांचा संप दोन महिने का लांबला?; शरद पवारांनी सांगितलं कारण

आयजीएम रुग्णालयात एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने जमले असून, तणावाचे वातावरण बनले आहे.एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे.यासाठी इचलकरंजी आगारात एसटी कर्मचारी उपोषण सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सोमवारी मंत्रालयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक झाली. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.

हा निर्णय मोबाईलमध्ये पाहिल्यांनातर एसटी कर्मचारी शरणाप्पा गिरमलप्पा मुंजाळे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()