धक्कादायक! बहिणीला शेवटचा फोन करत तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, पत्नीनंही स्वत: ला संपवण्याचा केला प्रयत्न

'क्षणार्धात विनोदने पायातील चप्पल काढली आणि थेट पुलावरून नदीत उडी मारली'
Ichalkaranji Crime news
Ichalkaranji Crime newsesakal
Updated on
Summary

विनोद याने खिशातील मोबाईल काढून बोलण्यासाठी गणेशकडे दिला. त्यानंतर क्षणार्धात त्याने पायातील चप्पल काढली आणि थेट पुलावरून नदीत उडी मारली.

इचलकरंजी : येथे दुथडी भरलेल्या पंचगंगा नदीत (Panchganga River) एका तरुणाने पुलावरून झोकून दिले. त्यानंतर तो बुडून बेपत्ता झाला आहे. हा प्रकार समजातच घटनास्थळी त्याच्या पत्नीनेही तसाच प्रयत्न केला; पण नागरिकांनी प्रसंगावधान राखत तिला रोखले. त्यामुळे तिचा जीव वाचला.

विनोद शब्बीर शिकलगार (वय २९, रा. यड्राव फाटा परिसर) असे तरुणाचे नाव आहे. हा प्रकार काल सकाळी सव्वा नऊच्या सुमारास तरुणाच्या पुतण्यासमोरच घडला. दरम्यान, पोलिस, महापालिका आपत्कालीन विभाग पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सलग आठ तास तरुणाचा शोध घेतला; पण विनोद सापडला नाही.

Ichalkaranji Crime news
Adv Ujjwal Nikam : 'पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकार जयंत पाटलांनाच, गटनेत्यालाच आपल्याकडं वळवण्याची रणनीती'

प्रवाहामुळे शोध मोहिमेत अडथळा येत होता. आज बुधवारी (ता. ९) सकाळी आठला पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांचे मत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विनोद शिकलगार काल सकाळी सकाळीच १२ वर्षांचा पुतण्या गणेश शिकलगार याच्यासह घराबाहेर पडला. त्याने घरापासून दुचाकीवरून येत पंचगंगा नदीकाठ गाठला. नदी परिसरात इतरत्र फिरून तो मोठ्या पुलावर पोहचला.

तिथं दुचाकी थांबवून दोघेही खाली उतरले. यावेळी विनोद याने खिशातील मोबाईल काढून बोलण्यासाठी गणेशकडे दिला. त्यानंतर क्षणार्धात त्याने पायातील चप्पल काढली आणि थेट पुलावरून नदीत उडी मारली. या घटनेनंतर घाबरलेल्या त्याच्या पुतण्याने आरडाओरडा सुरू केला. यामुळे पुलावरील ये-जा करणारी वाहने थांबली आणि त्यातून काही नागरिक मदतीसाठी धावले. मात्र, तोपर्यंत विनोद वाहून गेला.

Ichalkaranji Crime news
Maharashtra Politics : 'स्वाभिमानी'तला वाद चिघळणार? तुपकरांना 15 ऑगस्टची डेडलाईन, शेट्टी मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

या घटनेची माहिती मिळताच विनोद याच्या पत्नीसह नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. पती नदीत वाहून गेल्याचे समजताच विनोदच्या पत्नीनेही लहान पुलावरून नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला; पण नातेवाइकांनी प्रसंगावधान राखत तिला वाचवले. विनोदने नदीत उडी घेतल्याने धक्का बसलेल्या नातेवाइकांचा घटनास्थळी आक्रोश सुरू होता.

Ichalkaranji Crime news
Satara Politics : CM शिंदेंच्या जिल्ह्यात ठाकरे गट आजमावणार ताकद; उद्धव ठाकरेंना मिळणार काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ?

कुटुंबाचा आशीर्वाद अन् बहिणीला फोन

विनोद याने कुटुंबातील प्रत्येकाचे आशीर्वाद घेतले. घराबाहेर पडताच त्याने नातेवाइकांना फोन करण्यास सुरुवात केली. मोठ्या पुलावर आल्यावर शेवटी बहिणीला कॉल केला; पण तिच्याशी न बोलताच त्याने मोबाइल पुतण्याकडे देत नदीत उडी घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()